‘आदिदास’सोबत काम करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 08:41 IST2016-03-04T15:41:29+5:302016-03-04T08:41:29+5:30

‘आदिदास’च्या डिझाईन अ‍ॅकॅडमीमध्ये काम करण्यास इच्छूक उमेदवारांना नामी संधी उपलब्ध झाली आहे. 

The opportunity to work with 'Adidas' | ‘आदिदास’सोबत काम करण्याची संधी

‘आदिदास’सोबत काम करण्याची संधी

रत्येक वेळी आपल्याला हवा असणारा किंवा आवडणारा शूज मिळेलच असे नाही. अनेक दुकानांमध्ये फिरले किंवा आॅनलाईन शोधला तरी मनाला रुचेल, पटेल, शोभेल असा शूज सापडत नाही. तुम्हालादेखील मनासारखा शूज भेटत नसेल तर का नाही तुम्हीच तो डिझाईन करत?

स्पोर्ट शूज कंपनी ‘आदिदास’च्या डिझाईन अ‍ॅकॅडमीमध्ये काम करण्यास इच्छूक उमेदवारांना नामी संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीतर्फे पोर्टलँड, ओरेगॉन (अमेरिका) आणि हर्झाेजनॉरॅश (जर्मनी) येथील कार्यालयात प्रवेश देणे सुरू करण्यात आले आहे.

तुमच्यामध्ये जर शूज डिझायनिंगचे कौशल्य आणि सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी) असेल तुम्ही ट्राय करण्यास काही हरकत नाही. ग्राफिक डिझाईन, फॅशन किंवा अशाच प्रकारच्या शिक्षणाबरोबरच तुम्हाला तुमच्या क्रिएशनचा पोर्टफोलिया सादर करावा लागेल. त्याचा आढावा घेऊन तुम्हाला एक ‘डिझायनिंग टास्क’ देण्यात येईल.

adidas

यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या निर्मितीचे जर्मनीच्या मुख्यालयात प्रत्यक्ष मुल्यमापन करण्यात येणार. येथे जर तुमची निवड झाली तर कंपनीसोबत काम करण्याचा दोन वर्षांचा करार करण्यात येणार. तुमच्या डिझाईनच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व कार्यांत तुमचा सहभाग असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा मार्च आहे.

कसला विचार करताय? करणार का मग अप्लाय? आणि जर निवड झाली तर आम्हाला सांगायला विसरू नका.

Web Title: The opportunity to work with 'Adidas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.