2019मधील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे, कबीर सिंह. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी याच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. शाहीदप्रमाणेच शाहीदची पत्नी मीरा राजपूतही फार चर्चेत आहे. बॉलिवूडच्या अनेक लीडिंग लेडिजप्रमाणेच मीरा राजपूतही फिटनेस फ्रीक आहे. अनेकदा मीरा जिममध्ये जातानाही स्पॉट करण्यात आलं आहे.

मीरा आपला जिम लूक, फॅशनेबल कपड्यांव्यतिरिक्त महागड्या एक्सेसरीजमुळेही ओळखली जाते. यावेळीही मीरा आपल्या कपड्यांसोबतच फुटवेअरमुळे चर्चेत आहे. 

मीरा जिमच्या बाहेर  Nike (नाइकी)च्या नियॉन कलरच्या  स्लीवलेस टी-शर्ट आणि ब्लॅक लेगिंग्समध्ये अत्यंत सिम्पल पण स्टायलिश दिसत होती. परंतु आमचं लक्ष तिच्या लूकऐवजी मीराच्या ब्लॅक कलरच्या सिंपल स्लीप ऑनकडेच होतं.

 

आपल्या जिम लूकसोबत मीराने स्पोरट्स शूज किंवा स्नीकर्स नाही तर ब्लॅक कलरची चप्पल वेअर केली होती. मीराची ही चप्पल प्रसिद्ध ब्रँड Balenciaga होती. ब्लॅक कलरची लेदर पूल स्लाइड स्लिप ऑन्स होती. जिची किंमत ऐकून तुम्हीही म्हणाल की, बडे लोग, बडी बाते. कारण मीराच्या या स्लीप ऑनची किंमत होती 500 डॉलर म्हणजेच, 35 हजार रूपये. 

आता तुम्ही म्हणाल की, 35 हजार रूपयांची फक्त चप्पल. पण खरचं मीराच्या या ब्रँडेड स्लीप ऑनची किंमत 35 हजार आहे. एवढ्या पैशांमध्ये एखादी परदेशवारी सहज होईल. 

Web Title: Mira rajputs black pool slides costs 35 thousand rupess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.