मलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 15:23 IST2018-10-17T15:22:01+5:302018-10-17T15:23:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा भलेही तिच्या सिनेमातील करिअरमुळे चर्चेत राहत नाही. पण ती तिच्या फॅशनेबल आणि स्टायलिश ड्रेस सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Malaika Arora in a body hugging shimmery dress see pics | मलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा!

मलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा भलेही तिच्या सिनेमातील करिअरमुळे चर्चेत राहत नाही. पण ती तिच्या फॅशनेबल आणि स्टायलिश ड्रेस सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे हे वेगवेगळे आकर्षक लूक अनेकांना घायाळ करत असतात. मलायकाचा असाच एक खास लूक सध्या चर्चेत आला आहे. 

मलायका अरोरा ही सध्या सोशल मीडियात तिच्या एका गोल्डन ट्रान्सपरन्ट ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. नेहमीप्रमाणे मलायकाने हा आकर्षक ड्रेसही पूर्ण आत्मविश्वासाने कॅरी केला आहे. या ड्रेसला बॉडी हॅंगिंग शिमरी ड्रेस म्हटलं जातं. 

View this post on Instagram

मलायका अरोराने परिधान केलेला हा हटके ड्रेस यूसुफ अल जेसमीने डिझाईन केला आहे. हा ड्रेस फुल स्लीव्स गोल्डन कलरचा गॉर्जर बॉडी हॅंगिंग ड्रेस आहे. अनेकांनी कमेंट केल्या की, मलायका या ड्रेसमध्ये जलपरीसारखी दिसत आहे. स्लिम फिट लूकमुळे मलायका या ड्रेसमध्ये अधिकच आकर्षक दिसत आहे. 

Web Title: Malaika Arora in a body hugging shimmery dress see pics