करिना कपूरच्या 'या' डेनिम जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही दुबई टूर करू शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:58 IST2019-07-29T12:57:26+5:302019-07-29T12:58:38+5:30

सर्वात स्टायलिश बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत असणारी करिना अनेक महागड्या ब्रँड्ससाठीही क्रेझी असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तिच्या ब्रँडेड आउटफिट्स आणि अ‍ॅक्सेसरिजच्या चर्चा रंगल्याचेही आपण नेहमी ऐकतो...

Kareena kapoor seen wearing expensive denim jaket in airport | करिना कपूरच्या 'या' डेनिम जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही दुबई टूर करू शकता

करिना कपूरच्या 'या' डेनिम जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही दुबई टूर करू शकता

बॉलिवूडचीफॅशन क्वीन, फॅशनिस्ता आणि फॅशन आयकॉन अशा गोष्टींची जेव्हा होते, तेव्हा या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव करिना कपूरचं येतं. करिनाने बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेन्ड सेट केले आहेत. बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेन्ड करिनानेच रूढ केला. करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, कॅज्युअल लूक असो किंवा हॉलिडे लूक. सर्वांमध्ये ती फार हटके आणि क्लासी दिसते. 

सर्वात स्टायलिश बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत असणारी करिना अनेक महागड्या ब्रँड्ससाठीही क्रेझी असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तिच्या ब्रँडेड आउटफिट्स आणि अ‍ॅक्सेसरिजच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. सध्या ती लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत व्हेकेशनसाठी असून एका डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगसाठी मुंबईमध्ये येत असते. यावेळी तिचा एक लूक कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. 

सर्वात गंमतीदार गोष्ट म्हणजे, करिनाने सेम ड्रेस वेअर केला होता फक्त एका डेनिम जॅकेटचा वापर करून आपला लूक चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. 

करिनाच्या या एअरपोर्ट लूकबाबत बोलायचे झाले तर, तिने शनेलचा विंटेज व्हॅलंटाइन ड्रेस वेअर केला होता. हा रस्पबेरी कलरचा शर्ट ड्रेस असून त्यावर कोको शनेलचा लोगो प्रिंट केलेला होता. 

पुन्हा एअरपोर्टवर येताना तिने हाच ड्रेस वेअर केला होता. त्यासोबत तिने पॅच असलेलं डेनिम जॅकेट कॅरी केलं होतं. ज्यावर अ‍ॅक्ने स्टुडिओजचे बोल्ड कोलाज लोगोचे पॅचेस लावण्यात आले होते. यासोबत तिने व्हाइट स्नीकर्स वेअर केले होते आणि टॉट बॅग कॅरी केली होती.

करिनाने वेअर केलेलं हे जॅकेट Bla Konst आणि Starter Black Label चं कोलॅबोरेशन आहे. या जॅकेटची किंमत जवळपास 44; 627 रूपये आहे. 

Web Title: Kareena kapoor seen wearing expensive denim jaket in airport