१९५०मध्येच भारतीयांना ‘झिका’ ज्ञात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 02:12 IST2016-03-05T09:12:50+5:302016-03-05T02:12:50+5:30

 ‘झिका’ विषाणू भारतीय वैैज्ञानिकांना साठ दशके आधी १९५० मध्येच ठाऊक होता.

Indians were known as Jhika in 1950 only | १९५०मध्येच भारतीयांना ‘झिका’ ज्ञात

१९५०मध्येच भारतीयांना ‘झिका’ ज्ञात

ले पूर्वज किती महान होते याचे अनेक दाखले आपल्यासमोर आहेत. त्यात आणखी एक म्हणजे सध्या हाहाकार माजवणारा ‘झिका’ विषाणू भारतीय वैैज्ञानिकांना साठ दशके आधी १९५० मध्येच ठाऊक होता, अशी माहिती ‘इंडियन कॉऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) महासंचालिका सौम्या स्वामिनाथन यांनी दिली.

त्या म्हणाल्या, तेव्हाच्या वैज्ञानिकांनी ‘झिका’ विषाणूचे नमुने जतनदेखील करून ठेवले होते. मात्र, त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे ते विषाणू जगू शकले नाही. त्या १७व्या संसंर्गजन्य रोगांवरील जागतिक परिषदेत बोलत होत्या.

चाळीसच्या दशकात आफ्रि केत उगम पावलेल्या ‘झीका’ विषाणू आपल्या वैैज्ञानिकांना ज्ञात होता का या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.

Swaminath

भारतामध्ये या विषाणूची काय स्थिती आहे यावर माहिती देताना त्या म्हणाल्या की, आम्ही झिकावर नजर ठेवून आहोत. आपल्या प्रयोगशाळेत त्याचे निदान होईल अशा यंत्रणा अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अद्याप एकही झिकाची लागण झालेला रुग्ण आढळलेला नाही.

Web Title: Indians were known as Jhika in 1950 only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.