दीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 18:14 IST2018-11-14T18:11:28+5:302018-11-14T18:14:12+5:30

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि डॅशिंग हिरो रणवीर सिंह म्हणजे एक लविंग कपल. दीपिका आणि रणवीरचा लग्नसोहळा सध्या इटलीमधील लेक कोमामध्ये असलेला विला डेल बॅलबियानेलोमध्ये होत आहे.

have a look at deepika padukones reel life bridal look | दीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा!

दीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा!

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि डॅशिंग हिरो रणवीर सिंह म्हणजे एक लविंग कपल. दीपिका आणि रणवीरचा लग्नसोहळा सध्या इटलीमधील लेक कोमामध्ये असलेला विला डेल बॅलबियानेलोमध्ये होत आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नापेक्षा त्यांच्या फॅन्समध्ये उत्सुकता आहे की दीपिका आपल्या लग्नासाठी काय परिधान करेल? तिचा ब्रायडल लूक कसा असेल? तिचे दागिने, तिचा मेकअप याबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. परंतु दीपिकाच्या ओरिजनल्स लूक्सपेक्षा तिचे काही रिल लाइफ ब्राइडल लूक्स पाहूयात...

लाल रंगाची सिल्क साडी

एका इवेंटसाठी दीपिका पादुकोणने raw mangoने डिझाइन केलेली लाल रंगाची सिल्कची साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती एखाद्या नव्या नवरीप्रमाणे दिसत होती. लाल रंगाची ही ट्रेडिशनल साडी दीपिकाने सोन्याच्या पारंपारिक दागिन्यांसोबत अक्सेसराइज केली होती. 

रेड लहंगा लूक

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी शोस्टॉपर बनलेली दीपिका पादुकोण लाल रंगाच्या या लेहंग्यामध्ये फार सुंदर दिसत होती. यादरम्यान दीपिकाने ऑफ शोल्डर ब्लाउज परिधान केला असून त्या रेड लेहेंग्यावर गोल्डन कलरचं हेव्ही वर्क करण्यात आलं होतं. हा लूक कम्पीट करण्यासाठी दीपिकाने गळ्यामध्ये चोकर नेकलेस घातला होता. 

दक्षिण भारतीय वधू 

किंग खानसोबतचा चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस'मधील दक्षिण भारतीय नवरीच्या लूकमध्ये दीपिका फार सुंदर दिसत होती. पारंपारिक साउथ इंडियन साडीसोबत हेव्ही ज्वेलरी आणि गजरा हा पूर्ण लूक दीपिकावर फार सुंदर दिसत होता. 

रॉयल ब्राइड लुक

जेव्हा गोष्ट ऑन स्क्रीन ब्राइडल लूकची येते तेव्हा प्रत्येकाला आठवतो दीपिका पादुकोणचा पद्मावतमधील लूक. या चित्रपटामध्ये दीपिका प्रत्येक आउटफिटमध्ये एका रॉयल वधूप्रमाणे दिसत आहे. हेव्ही लेहेंगा, नाकातील मोठी नथ आणि हेव्ही ज्वेलरी हे सर्व दागिने दीपिकावर फार सुंदर दिसत आहेत. 

मॉर्डन ब्राइड 

जर दीपिकाच्या स्टाइल्स फॉलो करत असाल तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की तिला लाल रंग आणि साड्यांवर विशेष प्रेम आहे. दीपिकाच्या फेवरेट डिझायनर्सपैकी एक असलेल्या सब्या साचीने तिच्यासाठी एक रेड अॅन्ड व्हाइट स्ट्राइप डिझाइन केली होती. 
 

Web Title: have a look at deepika padukones reel life bridal look