फेसबुकवर 'गिफ्टिंग'चा बोगसपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:12 IST
फेसबुकवर 'सिक्रेट सिस्टर गिफ्ट एक्सचेंज' हा मेसज सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
फेसबुकवर 'गिफ्टिंग'चा बोगसपणा
दिवाळीमुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. मार्केटमध्ये खरेदीविक्रीची रेलचेल आहे. दिवाळीत भेटवस्तूंची मोठय़ा प्रमाणात देवाणघेवाण होते. फेसबुकवर 'सिक्रेट सिस्टर गिफ्ट एक्सचेंज' हा मेसज सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सांगण्यात येते की तुम्ही जर दहा डॉलरचे गिफ्ट विकत घेऊन ते मित्राला दिले आणि हा मेसेज सहा इतर महिलांना पाठविला तर तुम्हाला दोन आठवड्याच्या आता ३६ गिफ्टस् मिळतील. हा सगळा बोगसपणा आहे असे वेगळे सांगणे नको. साऊथ फ्लोरिडा विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन शिक्षक केली बर्न्स सांगतात की, 'कित्येक वर्षांपासून सुरु असणार्या पिरॅमिड स्किमचा हा ऑनलाईन प्रकार आहे. पूर्वी पत्रांच्या साहायाने असे मेसेज पाठविण्यात यायचे तर आता फेसबुकचा वापर होत आहे. त्यामुळे फार झपाट्याने याचा प्रसार होतोय. मुळात फेसबुकच्या नियम व अटीच्या विरोधात हे सगळे होत आहे.'