Diwali 2020 shopping tips: Tips for low cost smart shopping for Diwali | Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी

Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी

दिवाळीचा सण ३ ते ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरात दिवाळीच्याखरेदीसाठी लगबग सुरू आहे. कोरोनाकाळात एकत्र जमण्यावर बंदी असली  घरच्याघरी मात्र मोठ्या उत्साहात लोक दिवाळीचा सण साजरा करतील. सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे  खरेदी करताना लोकांच्या खिशाला कात्री लागू शकते. म्हणून स्मार्ट आणि कमी खर्चाच  जास्तीत जास्त चांगली खरेदी करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.  या  टिप्सचा वापर करून तुम्ही  भरपूर खरेदी ही कमी पैश्यात  करू शकता. कारण सध्या शॉपिंग मॉल्स, दुकानं, रस्त्यावर वस्तू विकणारी मंडळी सगळ्या ठिकाणी गर्दी आहे.  स्ट्रीट शॉपिंग दरम्यान घेतलेल्या अ‍ॅक्सेसरीज तुम्ही ब्रॅण्डेड गोष्टींसोबत मिक्स अँड मॅच करू शकता. यालाच हाय स्ट्रीट शॉपिंग आणि हाय एण्ड शॉपिंग कॉम्बिनेशन म्हणतात.

कपडे

कोणताही सण असो कपडे घेण्याासाठी मात्र लोकांची झुंबड उडते. कारण नवनवीन ट्रेंड्सनुसार कपडे बाजारात येत असतात.  अनारकली, लेहेंगा, साड्या नेहमीच घेतल्या जातात. यावेळी तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय करू शकता. वेस्टर्न ड्रेस, टॉप्स, स्कर्ट्स असे कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही त्याचं स्ट्रीट शॉपिंग करू शकता. मुंबईतील लिंक रोड, फॅशन स्ट्रीट, कुलाबा कॉजवे तर  पुण्यातील कॅम्प, तुळशी बाग, फग्र्युसन कॉलेज रोड शॉपिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहेत.

शहरातील शॉपिंग स्ट्रीट्सवर दिवाळीच्या आधी फ्रेश स्टॉक नेहमीत येतो. पण स्ट्रिट शॉपिंग करताना एक खबरदारी घ्यायला हवी. कारण कापडाचा रंग जाईल का?, एकदा धुतल्यानंतर  कापड कमी होईल का?, याचा विचार करून योग्य ड्रेसची निवड करा. साधारणे २०० ते  ५०० रुपयांपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चांगले कपडे मिळू शकतात.

फूटवेअर्स

प्रत्येकवेळी ड्रेस घेतल्यानंतर नवीन चपला किंवा बुट घ्यायलाच हवीत असं काही नाही. तुमच्याकडे नवीन ड्रेसवर सुट होईल असं काही नसेल तर तुम्ही नवीन चपला  घेण्याचा विचार करू शकता. रस्त्यावर शॉपिंग करताना तुम्हाला १५० पासून  ३५० पर्यंत चांगल्या चपला मिळू शकतात. पण स्त्यावरून घेतलेल्या चपला पायांना कधी कधी अपायकारक ठरू शकतात. ठरावीक ड्रेसवर मॅचिंग म्हणून फूटवेअर हवं असेल तर स्ट्रीट मार्केटमधून घ्यायला हरकत नाही. पण सतत या चपला वापरणं पायांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. रोज वापरण्यासाठी आरामदायक चप्पल असावी. 

डेकोरेशनचं सामान

दिवाळीत घर सजावटीच्या वस्तूदेखील बाजारात येतात. यामध्ये आकाशकंदील, पणत्या, दिवे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण मॉलमध्ये तुम्ही हा सामान घ्यायला गेलात तर खूप महागात पडू शकतं. स्टीट शॉपिंग करताना तुम्हाला आकर्षक सजावटीचे सामान, पेंटेड पणत्या, दिवे स्वस्तात मिळू शकतात.  सगळ्यात महत्वाचे पेंटेड दिवा किंवा समया घेताना तपासून पाहा. कारण अनेकदा पूर्ण सेट जेव्हा घेतला जातो. तेव्हा त्यातील एखादा दिवा फुटलेला असू शकतो. म्हणून आधीच पाहून घ्या. इलेक्ट्रॉनिक सजावटीच्या वस्तू आपल्या  जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या दुकानातून घ्या. म्हणजे खराब झाल्यास  बदलून घेता येऊ शकतं. 

दागिने 

सण म्हटलं की दागिने आलेच. गेल्या काही वर्षात सोन्याच्या दागिन्यांपेक्षा आर्टफिशियल दागिन्यांचा क्रेझ प्रचंड वाढला आहे. पुण्यातील तुळशी बाग, मुंबईतील भुलेश्वर, दादरचं कीर्तीकर मार्केट अशी काही ठिकाणं यासाठी उत्तम ठरतील. एखाद्या शोरूममधून किंवा मोठय़ा शॉपमध्ये तुम्हाला यापेक्षा जास्त व्हरायटीज पाहायला मिळणार नाहीत. २०० ते  १००० पर्यंत तुम्हाला आकर्षक आणि तुमच्या आऊटफिटवर मॅच होतील असेल दानिने सहज उपलब्ध होतील. 

Web Title: Diwali 2020 shopping tips: Tips for low cost smart shopping for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.