सायरसचे अभियानपॉपस्टार मिली सायरस आणि मडोना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:07 IST2016-01-16T01:11:39+5:302016-02-06T08:07:19+5:30

पॉपस्टार मिली सायरस आणि मडोना यांनी घरगुती हिंसाचाराच्...

Cyrus campaign popstar Miley Cyrus and Madonna ... | सायरसचे अभियानपॉपस्टार मिली सायरस आणि मडोना...

सायरसचे अभियानपॉपस्टार मिली सायरस आणि मडोना...

पस्टार मिली सायरस आणि मडोना यांनी घरगुती हिंसाचाराच्या विरोधात अभियान छेडले आहे. गेल्या आठवड्यात घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांसोबत त्यांनी एका रॅलीत सहभाग घेतला होता. 'जर तुम्ही घरगुती हिंसाचाराला विरोध केला तरच तुम्ही आनंदी जीवन जगू शकता' असे या अभियानाचे शिर्षक आहे. अशाप्रकारच्या अभियानात यापूर्वी अभिनेत्री किम कारदाशिया हिने सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
डेलच्या फॅनला अटक
गायिका लाना डेल रे हिच्या कॅलिफोर्निया येथील घराबाहेरील गॅरेज परिसरात संयशयास्पदरित्या फिरणार्‍या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती तिचा फॅन असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. डेलच्या या घराचे काम सुरू असून, अनोळखी व्यक्ती गॅरेज परिसरात फिरत असल्याचे एका कामगाराच्या निर्दशनास आले. त्याने तातडीने याबाबतची तक्रार पोलिसात केली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत ती व्यक्ती तेथून पसार झाली होती. मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली. त्या व्यक्तीकडे लॅपटॉप आणि काही पत्रही आढळून आले.
ब्रॅड-जॉर्जमध्ये टक्कर
बॅड्र पिट आणि जॉर्ज क्लूनी हे दोघेही सध्या एकमेकांना जोरदार टक्कर देत आहेत. दोघांचेही स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यामुळे सध्या यांच्यात कांदबरींवर आधारित चित्रपट बनविण्याची स्पर्धा रंगत आहे. ब्रॅडचा सध्याचा चित्रपट 'द बिग शॉर्ट' हा कांदबरीवरच आधारित असलेला चित्रपट आहे. याबाबत ब्रॅड सांगतो की, जॉर्जनेच मला कांदबरींवर आधारित चित्रपट बनविण्याचा सल्ला दिला होता.

Web Title: Cyrus campaign popstar Miley Cyrus and Madonna ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.