क्रिस ग्विनिथ चांगले मित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:57 IST2016-04-13T04:57:30+5:302016-04-12T21:57:30+5:30

हॉलीवुड अभिनेत्री ग्विनिथ पाल्ट्रोचे म्हणणे आहे की, तिचे आणि तिचा पहिला पती क्रिस मार्टिनमधील मित्रत्त्वाचे संबंध वैवाहिक जीवनापेक्षा अधिक चांगली आहे.

Chris Gwynith is a good friend | क्रिस ग्विनिथ चांगले मित्र

क्रिस ग्विनिथ चांगले मित्र

लीवुड अभिनेत्री ग्विनिथ पाल्ट्रोचे म्हणणे आहे की, तिचे आणि तिचा पहिला पती क्रिस मार्टिनमधील मित्रत्त्वाचे संबंध वैवाहिक जीवनापेक्षा अधिक चांगली आहे. क्रिस मार्टिन एक ब्रिटिश गायक आणि गीतकार आहे. तिला कोल्डप्ले बॅँडची प्रमुख गायक म्हणूनही ओळखले जाते. ग्विनिथ आणि क्रिसचे दोन वर्षांपूर्वीच संबंध संपुष्टात आले होते. मात्र दोघांमध्ये आजही मित्रत्त्वाचे संबंध आहेत. ग्विनिथ आणि क्रिसला एक मुलगी (अप्पल) आणि मुलगा (मोसेस) आहे. याबाबत ग्विनिथने सांगितले की, आमच्यात मित्रत्त्वाचे अतिशय चांगले संबंध आहेत. आम्ही दोघेही एकमेकांच्या अतिशय क्लोज आहोत. त्यात क्रिस मुलांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ करीत आहे. जेव्हा मुलांना त्याची आवश्यकता असते, तेव्हा तो हजर असतो, असेही तिने सांगितले.

Web Title: Chris Gwynith is a good friend