सावधान: आपला मित्र करतोय व्हॉट्स अॅपवर धोका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 15:56 IST2017-01-21T10:25:23+5:302017-01-21T15:56:38+5:30
व्हॉट्स अॅपवरुन काही माहिती चोरी जाण्याची प्रकरणे या अगोदर समोर आली आहेत, मात्र यापेक्षाही अजून नवीन धोका समोर आला आहे.

सावधान: आपला मित्र करतोय व्हॉट्स अॅपवर धोका !
व हॉट्स अॅपवरुन काही माहिती चोरी जाण्याची प्रकरणे या अगोदर समोर आली आहेत, मात्र यापेक्षाही अजून नवीन धोका समोर आला आहे. ज्याद्वारे यूजर्सची अतिशय व्यक्तिगत माहिती चोरली जात आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्या जवळच्या मित्राचा देखील वापर करुन घेतला जात आहे.
याअंतर्गत व्हॉट्स अॅप यूजर्सला एक लिंक पाठविली जाते. लिंक रिसीव्ह करणाऱ्या यूजर्सला ही लिंक मित्रांकडून आली असल्याचे दिसते. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण एका वेगळ्या पेजवर जातो, जिथे काही खास डिस्काऊंटची आॅफर दिसते.
डिस्काऊंट पेजवर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यक्तिगत माहितीविषयी विचारले जाते. जसेही यूजर्स आपली डिटेल्स भरतो, त्याला एका बनावट वेबसाइट्सवर पाठविले जाते. या वेबसाइट्सद्वारे मॅलवेअर आपल्या फोनमध्ये पाठविले जातात. आणि या मॅलवेअर्सद्वारेच हॅकर्स आपल्या बाबतची सखोल आणि संवेदनशील माहिती एकत्र करतात.
कॅस्परस्काय लॅबचे प्रिन्सिपल डेविड ईएमएम (सिक्युरिटी रिसर्चर) यांचे म्हणणे आहे की, हे स्कॅम बºयाच भाषांत काम करीत आहे. प्रत्येक प्रकारच्या भाषांमध्ये लोकांना शिकार बनविले जात आहे.
हा मेसेज यूजर्सला विश्वास देतो की, त्याला हा मेसेज १० जणांना पाठवायचा आहे आणि त्यानंतर त्याला काही प्रमोशनला आॅफर (जसेकी ८ पाऊंडचे डिस्काऊंट) मिळेल. या लोभापोटी यूजर या स्कॅमच्या जाळ्यात फसतात.
या प्रकारचा मेसेज जेव्हा आपण आपल्या मित्राला फॉरवर्ड करतो, तर तोदेखील या स्कॅमच्या जाळ्यात फसतात.