प्रियांका चोप्राच्या 'या' बॅगची किंमत वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:58 IST2018-08-27T17:50:01+5:302018-08-27T17:58:41+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी आपल्या ग्लॅमरस अवतारामध्ये दिसून येते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी प्रियांका काही दिवसातच अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर निक जोनाससोबत बोहल्यावर चढणार आहे.

this bag of priyanka chopra costs more than a lakh rupees | प्रियांका चोप्राच्या 'या' बॅगची किंमत वाचून थक्क व्हाल!

प्रियांका चोप्राच्या 'या' बॅगची किंमत वाचून थक्क व्हाल!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी आपल्या ग्लॅमरस अवतारामध्ये दिसून येते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी प्रियांका काही दिवसातच अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर निक जोनाससोबत बोहल्यावर चढणार आहे. यामुळे तिच्या आणि निकविषयीच्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. असं असलं तरिह तिची फॅन फॉलोइंग काही कमी झाली नाही. रेड कार्पेट असो किंवा कॅज्युअल आउटिंग. प्रियांका आपल्या लूकने नेहमीच साऱ्यांना घायाळ करते. 

निकसोबतच्या साखरपुड्यानंतर काही दिवसांनी मुंबईमध्ये प्रियांका चोप्रा  ब्राइट यल्लो जॅकेट आणि ब्लू जीन्समध्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ब्राइट यल्लो जॅकेटला प्रियांकाने ब्लॅक टॉपसोबत मॅच केलं होतं. त्यासोबतच प्रियांकाने गुच्ची (Gucci)  ब्रँडची बॅग कॅरी केली होती. 

अनेक लोकं सेलिब्रिटींची फॅशन फॉलो करताना दिसून येतात. काही दिवसांनी प्रियांकाचा हा लूक फॉलो करताना कोणी दिसलं तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. पण प्रियांकाचा लूक फॉलो केला तरीदेखील तिची बॅग कॉपी करणं थोडं कठीण होऊ शकतं. कारण या बॅगची किंमत जरा जास्तच आहे.  

प्रियांकाने जी बॅग कॅरी केली आहे. ती गुच्ची (Gucci) ब्रँडची Courrier GG Supreme tote बॅग आहे. या बॅगची किंमत जवळपास 1,40,000 रुपये इतकी आहे. प्रियांकाने याआधीही ही बॅग कॅरी केली होती. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिने याच बॅगसोबत 40,000 रुपयांची The Aluminium Edition ट्रॉली बॅगही कॅरी केली होती. 

Web Title: this bag of priyanka chopra costs more than a lakh rupees