विमानकंपनी उपलब्ध करणार ‘मित्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:39 IST2016-03-11T11:39:29+5:302016-03-11T04:39:29+5:30

अ‍ॅमस्टरडॅमच्या ‘शिफॉल’ विमातळावर लेओव्हर असणाऱ्या प्रवाशांना वेळ घालविण्यासाठी केएलम कंपनी एक स्थानिक मित्र उपलब्ध करून देणार आहे. 

Airlines will make available 'friends' | विमानकंपनी उपलब्ध करणार ‘मित्र’

विमानकंपनी उपलब्ध करणार ‘मित्र’

यावसायानिमित्त सतत प्रवासात असणाऱ्यांना अनोळखी शहरातील विमानतळावरील ‘लेओव्हर’ म्हणजे प्रवासातील थांबा किती कंटाळवाणा असतो हे चांगलेच माहित असेल. आणि त्यातल्या त्यात एकट्याने प्रवास करत असाल तर विचारूच नका. नुसता कंटाळा येतो.

हीच नड ओळखून केएलम या विमानकंपनीने ‘लेओव्हर विथ अ लोकल’ ही अनोखी आॅफर सुरू केली आहे. अ‍ॅमस्टरडॅमच्या ‘शिफॉल’ विमातळावर लेओव्हर असणाऱ्या प्रवाशांना वेळ घालविण्यासाठी कंपनी एक स्थानिक मित्र उपलब्ध करून देणार आहे.

अ‍ॅमस्टरडॅमध्ये राहणाऱ्या इच्छूक लोक या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सहा तासांसाठी शहराची ओळख करून देतील. त्यांच्याशी गप्पा मारतील.

अमेरिका, कॅनडा आणि इटली येथून २२ मार्च ते ३१ मे दरम्यान केएलम विमानातून प्रवास करणाºया १८ वर्षे वयापेक्षा मोठ्या प्रवाशांनाच ही सुविधा मिळणार आहे. ‘लेओव्हर विथ अ लोकल’ या केवळ आयओएस अ‍ॅपद्वारे तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे.

amsterdam

आॅफरमध्ये विमानतळ ते शहरातील सेंटरपर्यंतचे हायस्पीड ट्रेन तिकीट आणि लोकल मित्रासोबत एक कॉम्प्लीमेंटरी ड्रिंक मिळेल. 

‘आॅश्टुंग’ अ‍ॅड एजन्सीचा स्ट्रॅटेजिस्ट मायकेल वॅन डेन ब्रांडेने ही कल्पना सुचविली होती. तो म्हणतो, या आॅफरमध्ये स्थानिक मित्र म्हणून विदेशी पर्यटकांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक लोकांची निवड करण्यात येणार. विदेशी भाषा शिकणाºया विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. याप्रकारे ते त्या त्या देशाच्या नागरिकांशी त्यांच्या भाषेत प्रत्यक्ष बोलू शकतील.

Web Title: Airlines will make available 'friends'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.