क्रिती सनॉनचा ब्लॅक अ‍ॅन्ड बोल्ड लूक पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:52 IST2019-04-19T15:42:22+5:302019-04-19T15:52:41+5:30

बरेली की बर्फीनंतर लुका छिपीमधील आपल्या अभिनयाचे लाखो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन करण जौहर दिग्दर्शित कलंक चित्रपटामध्ये एका आयटम सॉन्गमधून दिसून आली.

Actress kriti sanons black and bold look will take your heart away | क्रिती सनॉनचा ब्लॅक अ‍ॅन्ड बोल्ड लूक पाहिलात का?

क्रिती सनॉनचा ब्लॅक अ‍ॅन्ड बोल्ड लूक पाहिलात का?

बरेली की बर्फीनंतर लुका छिपीमधील आपल्या अभिनयाचे लाखो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन करण जौहर दिग्दर्शित कलंक चित्रपटामध्ये एका आयटम सॉन्गमधून दिसून आली. अशातच गोष्ट जर फॅशन आणि स्टाइलबाबत असेल तर कृति भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसून येते. 

मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाइन करणारा मनिष मल्होत्राने एक स्पेशल पार्टि ऑर्गनाइज केली होती.

ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. परंतु या सर्वांमध्ये सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या क्रितीकडेच...

या पार्टिमध्ये क्रिती ऑल ब्लॅक लूकमध्ये बोल्ड अ‍ॅन्ड सेक्सी दिसत होती. क्रितीने ब्लॅकिश ग्रे कलरचा शॉर्ट स्कर्ट वेअर केला होता आणि त्यासोबत ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप वेअर केला होता.

क्रिती सनॉनच्या या गेटअपमध्ये हायलाइट होतं तिच्या क्रॉप टॉपचा नेट असणारा क्लीवेज. आपल्या या शॉर्ट ड्रेसला क्रितीने ब्लॅक कलरच्या ब्लेझरसोबत मॅच केलं होतं. त्यासोबत मोठे राउंड ईयररिंग्ज, मोकळे केस आणि बोल्ड रेड लिपस्टिक... या संपूर्ण लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती कृति.

Web Title: Actress kriti sanons black and bold look will take your heart away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.