पतीला संपवणाऱ्या मुस्कानच्या नावावर दुसऱ्याच तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; जाणून घ्या कोण आहे 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:17 IST2025-03-26T12:21:53+5:302025-03-26T13:17:38+5:30

मेरठ हत्याकांडातील आरोपी मुस्कान बॉलिवूड गाण्यावर नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल

Woman dancing on a Bollywood song is not Muskaan accused in the Meerut murder case | पतीला संपवणाऱ्या मुस्कानच्या नावावर दुसऱ्याच तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; जाणून घ्या कोण आहे 'ती'

पतीला संपवणाऱ्या मुस्कानच्या नावावर दुसऱ्याच तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; जाणून घ्या कोण आहे 'ती'

Claim Review : मेरठ हत्याकांडातील आरोपी मुस्कान नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: पीटीआय
Translated By: ऑनलाईन लोकमत

सोशल मीडियावर ४० सेकंदांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी 'मेरे रश्क-ए-कमर' गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुस्कान रस्तोगीचा असल्याचा दावा नेटकरी आहेत. मुस्कानने तिच्या प्रियकरासह मिळून मेरठमध्ये पतीची हत्या केली होती.

पीटीआयच्या फॅक्टचेकमध्ये व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. व्हिडिओतील 'मेरे रश्क-ए-कमर' गाण्यावर नाचणारी मुलगी मुस्कान रस्तोगी नसून, हरियाणातील सोनीपत येथील पलक सैनी आहे, जी स्टेज शोसारख्या कार्यक्रमात नाचते, असे तपासातून समोर आले आहे. नेटकरी हा व्हिडीओ खोटा दाव्यासह शेअर करत आहेत.

दावा: २१ मार्च २०२५ रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, एका युजरने, काळजीपूर्वक पहा, ही तीच मुस्कान रस्तोगी आहे जिने तिच्या नवऱ्याचे १५ तुकडे केले आहेत" असं लिहीलं. व्हायरल पोस्टची लिंक आणि अर्काइव्ह लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पाहता येईल.

तर, २२ मार्च २०२५ रोजी फेसबुकवर व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, दुसऱ्या युजरने, नीट बघा, ही तीच मुस्कान रस्तोगी आहे जिने तिचा मित्र पंडित साहिल शुक्ला सोबत पती सौरव राजपूतचे १५ तुकडे केले होते, असं म्हटलं. व्हायरल पोस्टची लिंक आणि अर्काइव्ह लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पाहता येईल.

व्हायरल दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी, पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सची रिव्हर्स इमेज शोधली. तपासादरम्यान, सोनीपत, हरियाणातील पलक सैनी नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरची पोस्ट आढळली, ज्यामध्ये तोच व्हिडिओ १८ मार्च २०२५ रोजी अपलोड केला गेला होता. पोस्टची लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

याशिवाय पलक सैनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओसारखेच इतर अनेक व्हिडिओही पाहायला मिळाले. या सर्व व्हिडिओमध्ये तीच डान्सर पलक सैनी आहे जी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पुढील तपासात, पलक सैनीचे फेसबुक अकाऊंट सापडले. तिथे तिने तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत. पोस्टची लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी धक्कादायक कृत्य केलं ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मुस्कानने साहिलसोबत मिळून लंडनहून परतलेल्या पती सौरभ राजपूतची हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट टाकले. इतकेच नाही तर हा भयंकर गुन्हा केल्यानंतर मुस्कान आपल्या प्रियकरासह कोणतीही चिंता न करता हिमाचलला फिरण्यासाठी निघून गेली. या गुन्ह्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केल्याचे बोलले जात आहे.

मेरठच्या हत्येची आरोपी मुस्कान रस्तोगीचा डान्स व्हिडिओ नेटकरी पलक सैनीचा डान्स व्हिडिओ शेअर करत आहेत. पोस्टची लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

व्हायरल व्हिडिओमध्ये डान्स करणारी मुलगी मुस्कान नाही, असे तपासात समोर आले आहे. तर, हरियाणातील सोनीपत येथील पलक सैनी आहे. नेटकरी दिशाभूल करणारा हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

दावा

व्हिडिओमध्ये नाचणारी तरुणी मेरठची मुस्कान रस्तोगी आहे, जिने तिच्या प्रियकरासह पती सौरभची हत्या केली होती.

सत्यता 

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कच्या तपासणीत व्हायरल सोशल मीडिया पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे आढळले.

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओमध्ये डान्स करणारी मुलगी मुस्कान नाही, असे तपासात समोर आले आहे. तर, हरियाणातील सोनीपत येथील पलक सैनी ही नृत्यांगना आहे. नेटकरी दिशाभूल करणारा हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

(सदर फॅक्ट चेक पीटीआय या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Woman dancing on a Bollywood song is not Muskaan accused in the Meerut murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.