शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पत्रकारानं संदर्भहीन प्रश्न विचारला, पोलीस अधिकाऱ्यानं बेचकीनं नेम धरला अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 1:48 PM

संदर्भहीन प्रश्न विचारल्यानं पोलीस अधिकाऱ्यानं पत्रकारावर बेचकीचा वापर करून हल्ला केला; फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. पोलिसाच्या हातात एक बेचकी आहे. अधिकाऱ्यानं बेचकी हातात धरून नेम धरला आणि पत्रकारावर हल्ला केला, त्याला धडा शिकवला, असे दावे केले जात आहेत. ट्विटरवर पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

शनिवारपासून (१२ मार्च) पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होऊ लागला. 'संदर्भहीन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर नवनियुक्त पोलीस प्रवक्त्यांनी बेचकीनं निशाणा साधला,' असं ट्विट एका वापरकर्त्यानं (_@Sir_CharlesR) केलं. या ट्विटला २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. ८ हजारपेक्षा अधिक जणांनी ते रिट्विट केलं. कालही अनेकांनी पोलिसाचा फोटो फॉरवर्ड केला. त्यामुळे तो बराच व्हायरल झाला.

व्हायरल झालेला पोलीस अधिकारी युगांडाचा आहे. त्यावरून केनियातील प्रसिद्ध वकील अहमदनासीर अब्दुल्लाही यांनी युगांडा पोलिसांची खिल्ली उडवली. 'आमचे शेजारी', असं म्हणत त्यांनी युगांडा पोलिसांना टोला लगावला. त्यानंतर युगांडा पोलिसांनी अब्दुल्लाही यांच्या ट्विटला उत्तर दिलं. व्हायरल ट्विटमधील दावा खोटा असल्याचं युगांडा पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितलं. त्यानंतर अब्दुल्लाही यांनी ट्विट डिलीट केलं. 

नेमकं सत्य काय?व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव फ्रेड इनागा आहे. गेल्या वर्षी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील त्यांचा फोटो आता व्हायरल झाला आहे. नव्या गुन्हेगारी टोळ्यांची माहिती देण्यासाठी इनागा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या टोळ्या नागरिकांना बेचकीचा वापर करून लक्ष्य करायच्या. 'ते अशा प्रकारे तुमच्यावर निशाणा साधतात. यावरून तुम्हाला गांभीर्य समजेल,' असं इनागा सांगत होते. इनागा यांचा गेल्या वर्षींचा फोटो आता चुकीच्या माहितीसह व्हायरल होत आहे.