शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Fact Check : 1 मार्चपासून कोरोना लसीसाठी मोजावे लागणार 500 रुपये?; जाणून घ्या "सत्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 18:19 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आलं. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. यानंतर आता लसीकरणाचा दुसरा टप्पा येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे. 

सोशल मीडियावर लसीकरणाबाबत अनेक मेसेज हे सातत्याने व्हायरल होत आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत Whatsapp वर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीसाठी 500 रुपये मोजावे लागतील असं म्हटलं आहे. तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना आपल्यासोबत वोटर आयडी, पॅनकार्ड आणावं लागले असं देखील म्हटलं आहे. मात्र आता पीआयबीनेहा दावा फेटाळून लावला आहे. हे पूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे. सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल. कोरोना लसीसाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. एक मार्चपासून ऑनलाईन नोंदणी करू शकता. Co-Win App 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तोपर्यंत ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

1 मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार Corona Vaccine; जाणून घ्या, लसीकरणासाठी कसं करायचं रजिस्ट्रेशन?

को-विन (Co-Win), आरोग्य सेतू (Aarogya Setu) अ‍ॅप या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. लस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम ‘को-विन’ अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून नावाची नोंदणी करावी लागेल. ऑनलाइन नोंदणी करताना सर्वात आधी तुमचा मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला अकाऊंट तयार करण्यासाठी ओटीपी मिळेल. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि आवश्यक ओळखपत्रं अपलोड करा. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल पण तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला इतर आजार असेल तर तुम्हाला असलेल्या आजाराचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर ही सुविधा मिळू शकेल. तुम्हाला मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन तिथं आपली नोंदणी करू शकता. खासगी केंद्रे व रुग्णालयांत या लसीसाठी ठरावीक शुल्क आकारले जाईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत