'सबका साथ सबका विकास' योजनेअंतर्गत मोदी सरकार खात्यात पाठवणार 1 लाख रुपये?, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 06:05 PM2021-02-04T18:05:05+5:302021-02-04T18:11:42+5:30

Sabka saath sabka Vikas Scheme : गरजू लोकांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. काही योजनांअंतर्गत नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे देखील पाठवले जातात.

it is claimed that modi government transfer 1 lakh rupees under sabka saath sabka vikas scheme know about it | 'सबका साथ सबका विकास' योजनेअंतर्गत मोदी सरकार खात्यात पाठवणार 1 लाख रुपये?, जाणून घ्या सत्य

'सबका साथ सबका विकास' योजनेअंतर्गत मोदी सरकार खात्यात पाठवणार 1 लाख रुपये?, जाणून घ्या सत्य

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून गरीब, शेतकरी आणि गरजू लोकांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. काही योजनांअंतर्गत नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे देखील पाठवले जातात. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून WhatsApp वर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोदी सरकार सबका साथ सबका विकास योजना (sabka saath sabka vikas scheme) याअंतर्गत सर्व लोकांच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये ट्रान्सफर करत असल्याचा दावा केला आहे. 

भारत सरकारची संस्था असणाऱ्या पीआयबीने या व्हायरल मेसेजमागील सत्यता पडताळून पाहिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. पीआयबीने या मेसेजमध्ये करण्यात आलेले सर्व दावे फेटाळले आहेत. तसेच हा दावा खोटा असल्याचं देखील म्हटलं आहे. सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.

WhatsApp वर जो मेसेज व्हायरल होत आहे त्यामध्ये एक मोबाईल क्रमांक देखील आहे- 7682008789. Truecaller वर हा क्रमांक पडताळून पाहिला असता त्यावर नरसिंह रंधारी हे नाव दिसत आहे. या App च्या मते हा क्रमांक ओडिसामधील आहे. तुम्ही पीआयबीच्या https://factcheck.pib.gov.in/ याठिकाणी जाऊन फॅक्टचेक करू शकता. त्याचप्रमाणे 918799711259 या WhatsApp क्रमांकावरून किंवा pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. ही सर्व माहिती पीआयबीची अधिकृत वेबसाईट https://pib.gov.in  वर देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर रेशन कार्ड होणार रद्द? जाणून घ्या "सत्य"

एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर कार्ड रद्द होणार असल्याचं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रेशन कार्ड रद्द होणार याबाबत अधिक माहिती घेतली असता हा मेसेज खोटा असल्याची माहिती आता समोर आली आहे. रेशन कार्ड बातम्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर कार्ड रद्द होणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती. ही बातमी निराधार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. भारत सरकारचं अधिकृत ट्विटर हँडल असणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या दाव्याबाबत तपास केला असता सत्य समोर आलं आहे. त्यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क करायचाय?; मग जाणून घ्या फोन नंबर, पत्ता अन् बरंच काही...

लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदारांच्या मदतीसाठी 24/7 हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या या हेल्पलाईनवर खासदारांपेक्षा सर्वसामान्यांकडून अधिक फोन येत आहेत. हेल्पलाईनवर फोन करताना अनेक जण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन नंबर मागत आहेत. अनेकांना मोदींना भेटायचे आहे. तर काहींना सूचना करायच्या आहेत. जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा हे जाणून घेऊया...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचण्याची सर्वात साधी सोपी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. तुम्ही मोदींच्या अधिकृत अकाउंटवरून तुमच्या भावना पोहोचवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट्स

www.facebook.com/narendramodi
twitter.com/narendramodi
https://plus.google.com/+NarendraModi,
https://www.youtube.com/user/narendramodi
https://www.instagram.com/narendramodi
https://www.mygov.in/home/61/discuss/ 

या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार, शुभेच्छा आणि सूचना पाठवू शकतात. तसेच तुम्ही डिबेटमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच नरेंद मोदी अ‍ॅप (नमो अ‍ॅप) वरूनही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात.

 

Web Title: it is claimed that modi government transfer 1 lakh rupees under sabka saath sabka vikas scheme know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.