शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: अहो, ते माझं वाक्य नाही! मी तसं कधी म्हटलंच नाही!! रतन टाटांचे उद्गार ऐकून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 12:52 IST

रतन टाटांनी सांगितलं 'त्या' वाक्यामागचं सत्य; मुलाखतकार महिला अवाक्

टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा. स्पर्धेच्या युगात मुल्यांशी कोणतीही तडजोड न करता व्यवसाय करणारे रतन टाटा कोट्यवधी भारतीयांसाठी आदरणीय व्यक्तीमत्त्व. टाटा समूहाला दिशा देणारे, देशाचा विचार आधी करणारे रतन टाटा अनेकांसाठी प्रेरणास्थान. टाटांची अनेक वाक्यं इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. पण यातलंच एक वाक्य माझं नाही, मी असं कधी म्हटलेलंच नाही, असं खुद्द रतन टाटांनी सांगितलं तर? एका मुलाखतीत असा किस्सा घडला आहे.

योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि ते योग्य ठरवतो. रतन टाटांचं हे वाक्य तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल. गुगलवर जाऊन रतन टाटा कोट्स असं सर्च केल्यावर मिळणाऱ्या रिझल्टमध्ये हे वाक्य अगदी सहज सापडतं. पण हे वाक्य रतन टाटांचं नाहीए. दस्तुरखुद्द रतन टाटांनी एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली.

मुलाखतीतला संवाद काय?योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि ते योग्य ठरवतो, असं तुम्ही म्हणाला होतात. त्याबद्दल काय सांगाल, असा सवाल मुलाखत घेणाऱ्या महिलेनं रतन टाटांना विचारला. त्यावर माझ्या उत्तरानं कदाचित तुम्ही नाराज व्हाल, असं टाटा म्हणाले. 'मी तसं कधीच म्हटलेलं नाही. ते वाक्य माझं नाही. फेसबुक, ट्विटरवर माझ्या नावानं ते वाक्य व्हायरल झालं. तुम्ही सोशल मीडियावर काय कारवाई करणार?,' असं टाटा म्हणाले.

'ती' पोस्टदेखील रतन टाटांची नाही बरं!२०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आला. त्यावेळी अर्थव्यवस्थाच मोडून पडणार, अशी भीती काही जण बोलून दाखवत होते. त्यावेळी रतन टाटांच्या नावानं एक प्रेरणादायी पोस्ट फिरत होती. मात्र ती पोस्ट आपली नसल्याचं रतन टाटांनी ट्विट करून सांगितलं होतं. माझ्या नावानं व्हायरल होणाऱ्या पोस्ट पडताळून पाहा, असं आवाहन टाटांनी केलं होतं. मला काही म्हणायचं असल्यास त्यासाठी मी माझ्याकडे असलेल्या अधिकृत चॅनल्सचा वापर करेन, असंही टाटांनी सांगितलं होतं.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा