Fact Check: क्लासरूममध्ये विद्यार्थ्याला मारहाण करणारा हा Video भारतातील नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:20 IST2025-03-12T16:27:55+5:302025-03-17T18:20:34+5:30

या प्रकाराची दखल घेत उत्तर प्रदेश पोलीस, डीजीपी यांनी हा व्हिडिओ कुठला आहे हे शोधले पाहिजे अशी मागणी युजर्सने केली होती.

Fact Check: Viral video of a student being beaten in a classroom is not from India | Fact Check: क्लासरूममध्ये विद्यार्थ्याला मारहाण करणारा हा Video भारतातील नाही

Fact Check: क्लासरूममध्ये विद्यार्थ्याला मारहाण करणारा हा Video भारतातील नाही

Claim Review : उत्तर प्रदेशातील एका शाळेत शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करत आहे, पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: आजतक
Translated By: ऑनलाइन लोकमत

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ एक शिक्षक क्लासरूममधल्या विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारहाण करत असल्याचं दिसून येते. व्हिडिओ शेअर करणारे लोक हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असून या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करत आहेत. 

हा व्हिडिओ पोस्ट करून एका युजरने लिहिलंय की, हे निर्दयी महाग महाग फी घेतात आणि मुलांसोबत अशाप्रकारे वागणूक होते, या प्रकाराची दखल घेत उत्तर प्रदेश पोलीस, डीजीपी यांनी हा व्हिडिओ कुठला आहे हे शोधले पाहिजे अशी मागणी केली.

या व्हिडिओची पडताळणी केली असता हा व्हायरल व्हिडिओ २०२१ चा असल्याचं समोर आले. हा व्हिडिओ भारतातील नसून तो उत्तर आफ्रिकेच्या ट्यूनीशिया देशातील आहे. त्याचा उत्तर प्रदेशची काहीही संबंध नाही हे पुढे आले.

सत्यता कशी पडताळली?

या व्हिडिओच्या कीफ्रेम्स रिवर्स सर्च केल्यानंतर त्याचे स्क्रिनशॉट ट्यूनीशियाई रेडिओ स्टेशन Knooz FM च्या अधिकृत फेसबुक पेजवर २५ नोव्हेंबर २०२१ रोजी पोस्ट सापडली. या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ट्यूनीशियामधील शहर सॉसे इथली आहे. जिथे खैरूद्दीन पाशा नावाच्या शाळेतील शिक्षकाने शाळकरी मुलीवर हिंसेचा वापर केला होता.

विभागीय शिक्षण संचालक लैला बिन सस्सी यांनी या व्हिडिओबाबत Knooz FM ला सांगितले की, व्हायरल व्हिडिओत दिसणारा व्यक्ती शिक्षण विभागातील असून तो एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओची पुष्टी झाल्यानंतर संबंधित प्रकरणात विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. 

व्हिडिओत मारहाण करणारा व्यक्ती खैरुद्दिन पाशा शाळेत उपशिक्षक म्हणून काम करत होता. तो पाचवीतील विद्यार्थ्यांना शिकवायचा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये अनेक वृत्तपत्रात छापली होती. त्याचे काही रिपोर्टही पाहू शकता. त्यानुसार, ही घटना सॉसे गवर्नरेटच्या एका प्राथमिक शाळेत घडली आहे. त्याठिकाणी शिक्षक मुलाला मारहाण करताना दिसतो. याआधीही या शिक्षकाने मुलांना अशीच मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेची दखल शिक्षण खात्याने घेत पीडित विद्यार्थ्याला मानसोपचार तज्त्रांकडे पाठवले. २०२१ साली पोस्ट झालेल्या अनेक सोशल मिडिया पोस्टमध्ये ही घटना ट्यूनीशियाच्या सॉर्से शहरातील असल्याचं सांगितले आहे. 

निष्कर्ष - सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ ट्यूनीशियाच्या शिक्षकाने मुलीने मारहाण करतानाचा आहे. तो भारतातील उत्तर प्रदेशचा व्हिडिओ असल्याचं सांगून दिशाभूल करण्यात येत आहे. 

(सदर फॅक्ट चेकआजतक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check: Viral video of a student being beaten in a classroom is not from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.