शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

Fact Check: अमित शाह यांनी देश तोडण्याचं विधान केल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 22:31 IST

Amit Shah: एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओचा आधार घेत विरोधकांकडून शाह यांना लक्ष्य केलं जात आहे.

Created By: आज तकTranslated By : ऑनलाइन लोकमत

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर मागील काही दिवसांपासून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओचा आधार घेत विरोधकांकडून शाह यांना लक्ष्य केलं जात आहे. "अमित शाह यांनी देश तोडण्याची भाषा केली," असा दावा या व्हिडिओच्या आधारे केला जात आहे. "दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे या देशाचे दोन तुकडे व्हायला हवेत," असं या व्हायरल व्हिडिओत अमित शाह यांनी म्हटल्याचं दिसत आहे.

अमित शाह यांचा हा व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर एका यूजरने म्हटलं आहे की, "एकीकडे श्री. अखिलेश आणि श्री. राहुल गांधी हे संपूर्ण देशाला एकत्र करत आहेत. हिंदू-मु्स्लीम-शीख-ईसाई या सर्व धर्मांना सोबत घेऊन चालत आहेत. मात्र ही व्यक्ती देशाचे तुकडे व्हायला हवेत, असं म्हणत आहे. दक्षिणेत जागृकता जास्त असल्याने हे लोकं जिंकू शकत नाहीत. जो देशाचे तुकडे करेल त्याचे आम्ही तुकडे करू. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी किती पातळी सोडणार आहात?" असा सवाल करत सदर यूजरने अमित शाह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मात्र आम्ही केलेल्या फॅक्ट चेकमध्ये सोशल मीडिया यूजरने अमित शाह यांच्याबाबत केलेला दावा असत्य असल्याचे आढळून आले आहे. अमित शाह यांनी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. काँग्रेसवर निशाणा साधत अमित शाह यांनी म्हटलंय की, "दक्षिण आणि उत्तर असं देशाचं विभाजन व्हायला हवं, अशी काँग्रेसची पॉलिसी आहे." मात्र शाह यांचा याबाबतचा अर्धवट व्हिडिओ शेअर करत संभ्रम निर्माण केला जात आहे.

कसं समोर आलं सत्य?

व्हायरल व्हिडिओत अमित शाह यांच्या हातात News18 या वृत्तवाहिनीचा माइक दिसत आहे. याबाबतची माहिती घेत आम्ही कीवर्ड सर्च केला तेव्हा News18च्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ CNN News18 च्या यूट्यूब चॅनलवर आढळून आला. हा व्हिडिओ २० मार्च २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओत २ तास ४० मिनिटांनंतर अमित शाह नेमक्या कोणत्या मुद्द्यावर भाष्य करत आहेत, हे स्पष्ट होतं. 

अँकरने काँग्रेस नेत्याच्या एका वादग्रस्त वक्तव्याविषयी प्रतिक्रिया विचारल्यानंतर अमित शाह यांनी म्हटलं होतं की, "हे बघा याचं उत्तर तर राहुलजींनी द्यायला हवं. आजपर्यंत काँग्रेसने त्या नेत्याच्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळं केलेलं नाही. देशाचं दक्षिण आणि उत्तर असं विभाजन व्हायला हवं, अशी काँग्रेसची पॉलिसी असल्याचा समज देशातील जनतेचा होत आहे. मात्र आता भाजप इतका बलवान आहे की, काँग्रेसला दुसऱ्यांदा या देशाची फाळणी करू देणार नाही. आम्ही कधीही या देशाचे तुकडे होऊ देणार नाही."

दरम्यान, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे की, गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ अर्धवट असून त्यांच्याबाबत केलेला दावा खोटा आहे. सदर फॅक्ट चेक आज तक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसFake Newsफेक न्यूज