Created By: PTI Translated By: ऑनलाईन लोकमत
सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार शेअर केला आहे ज्यामध्ये युजर्सनी असा दावा केला आहे की, टेलिव्हिजन स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका चिमुकल्याला पाहिलं, जो सतत परीक्षा असल्याच्या प्रेशरबद्दल तक्रार करत होता. पीटीआय फॅक्ट चेक डेस्कच्या तपासात व्हायरल व्हिडीओ डिजिटली एडिट केलेला होता असं आढळून आलं आहे. मूळ फुटेजमध्ये पंतप्रधान मोदी २०१९ मध्ये चांद्रयान-२ प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहत होते. पंतप्रधान मोदी टीव्ही स्क्रीनवर चिमुकल्याला रडताना पाहत असल्याचा सोशल मीडिया पोस्टमधील दावा खोटा होता.
दावा
२२ फेब्रुवारी रोजी, एका इन्स्टाग्राम युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये मोदी परीक्षेच्या दबावाबद्दल तक्रार करत असलेल्या एका चिमुकल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहत असल्याचा दावा केला होता.
व्हिडिओमधील मुलगा म्हणतो, “आम्हालाही जीवन जगायचं आहे. पण एकामागून एक अनेक परीक्षा असतात. मी पंतप्रधान झाल्यावर, मी परीक्षांवर बंदी घालेन.”
पोस्टची लिंक आणि अर्काइव्ह लिंक येथे आहे आणि खाली स्क्रीनशॉट आहे.
डेस्कने इनव्हिड टूलद्वारे व्हायरल व्हिडीओ पाहिला आणि अनेक कीफ्रेम काढल्या. गुगल लेन्सद्वारे एक कीफ्रेम पाहिल्यानंतर, डेस्कला असं आढळलं की इतर अनेक युजर्स समान दाव्यांसह तोच व्हिडीओ शेअर करत आहेत. अशा दोन पोस्ट येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात आणि त्याचं अर्काइव्ह व्हर्जन येथे आणि येथे पाहता येऊ शकतं.
सर्च रिझल्ट अधिक स्कॅनिंग केल्यावर, डेस्कला २२ जुलै २०१९ रोजी टाइम्स ऑफ इंडियाने लिहिलेली एक एक्स पोस्ट आढळली, ज्याच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदी चंद्रयान २ चे प्रक्षेपण पाहत असल्याचं नमूद केलं होतं.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं होतं: “#GSLVMkIII #ISRO #IndiaMoonMission. #Chandrayaan2 सारखे प्रयत्न आपल्या हुशार तरुणांना विज्ञान, उच्च दर्जाचे संशोधन आणि नवे उपक्रम पाहण्यास आणखी प्रोत्साहित करतील - पंतप्रधान नरेंद्र मोदी”
पोस्टची लिंक येथे आहे आणि खाली स्क्रीनशॉट आहे.
डेस्कला व्हायरल व्हिडीओ आणि एक्स पोस्टमध्ये अनेक समानता आढळल्या; खाली तेच दाखवणारा एक फोटो आहे.
त्यानंतर डेस्कने संबंधित मीडिया रिपोर्ट्स शोधण्यासाठी गुगलवर कस्टमाइज्ड कीवर्ड सर्च केले आणि २२ जुलै २०१९ रोजी इंडिया टुडेचा एक रिपोर्ट सापडला. रिपोर्टचे शीर्षक असं होतं - “पीएम मोदी चंद्रयान-२ लाँचचे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत”
रिपोर्टची लिंक येथे आहे आणि खाली स्क्रीनशॉट आहे.
व्हायरल व्हिडिओ आणि बातम्यांमधील साम्य अधोरेखित करणारा एक फोटो खाली दिला आहे.
पोस्टचं डिस्क्रिप्शन असं होतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोने चंद्रयान-२ लाँचचे लाईव्ह टेलिकास्ट पाहिले. इस्रो मून मिशन, चंद्रयान २, श्रीहरिकोटा स्पेस स्टेशनवरून यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. इस्रो स्पेस सेंटरमध्ये तणावपूर्ण उलटी गिनतीनंतर, सोमवारी ठीक २:४३ वाजता चांद्रयान २ चे प्रक्षेपण झाले. १५ जुलै रोजी पहिला प्रयत्न तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाल्यानंतर सोमवारी दुपारी बहुप्रतिक्षित प्रक्षेपण एक अब्ज लोकसंख्येने पाहिले. चांद्रयान २ ने सर्वात शक्तिशाली GSLV-Mk-III रॉकेट, "बाहुबली" वरून उड्डाण केले.
त्यानंतर, डेस्कने असा निष्कर्ष काढला की व्हायरल व्हिडिओ डिजिटली एडिट करण्यात आला होता, कारण पंतप्रधान मोदी २०१९ मध्ये चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहत होते.
दावा
पंतप्रधान मोदींनी टेलिव्हिजन स्क्रीनवर एका मुलाला परीक्षेच्या दबावाबद्दल तक्रार करताना पाहिले.
सत्य
व्हायरल व्हिडिओ डिजिटली एडिट करण्यात आला आहे, कारण पंतप्रधान मोदी २०१९ मध्ये चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहत होते.
निष्कर्ष
अनेक सोशल मीडिया युजर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टेलिव्हिजन स्क्रीनवर एका मुलाला परीक्षेच्या दबावाबद्दल तक्रार करताना पाहण्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर केला. त्यांच्या चौकशीत, डेस्कने असा निष्कर्ष काढला की व्हायरल व्हिडिओ डिजिटली एडिट करण्यात आला होता कारण पंतप्रधान मोदी २०१९ मध्ये चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाचे प्रसारण पाहत होते.
(सदर फॅक्ट चेक PTI या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)