शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

वन संपदा राखतायत धरणातील पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:32 AM

पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा प्रदेश आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजुला वनाच्छादन असल्याने जमिनीची धुप झाली नाही. ही झाडं या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वात महत्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.

ठळक मुद्देवन संपदा राखतायत धरणातील पाणी! जमिनीची धूप होण्यापासून मिळतेय रक्षण

प्रगती जाधव-पाटीलसातारा : पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा प्रदेश आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजुला वनाच्छादन असल्याने जमिनीची धुप झाली नाही. ही झाडं या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वात महत्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.राज्यात साताऱ्याची समृध्द ओळख ही येथील धरणं आणि त्यातील पाणी यामुळे आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकाला पाणी पुरवठा करणारे मोठे कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. याबरोबरीने अन्य छोटी मोठी धरणंही जिल्ह्याचा पिण्याचा, सिंचनाचा आणि विज निर्मितीचा भार उचलत आहेत.

पावसाचं पाणी धरणांपर्यंत जाण्यापूर्वी ते वनक्षेत्रातून जाते. वनक्षेत्रातून गाळून आलेलं पाणी धरणात साठत असल्यामुळे वाहून आलेल्या पाण्यातून मातीचा अंश फारसा आढळत नाही. परिणामी धरणांमध्ये गाळ साठण्याचं प्रमाण कमी असून त्याचं श्रेय धरण परिसरातील वनक्षेत्राला जाते.जिल्ह्याच्या वनक्षेत्रांत वाघाटी, चिंच, उंबर, बारें, सिताफळ, रामफळ, भोकरं, जांभूळ, करवंद ही फळं तर हेरडा, बेहडा, ऐन, किंजळ, नाना, शेर, अंजनी, डाका, पुमा अशा वनौषधीही येथे मोठ्या प्रमाणात आढळून येते. सदा हरित, शुष्क भागासह निमसदा हरित भागही वनक्षेत्रांमध्ये आढळून येतो. इतकी वैविधतपूर्ण समृध्दता अन्य कुठेही आढळून येत नाही, हे विशेष.झाड तेच रूप वेगळं!सातारा जिल्ह्यात पठारावर आणि सपाटीला येणाऱ्या झाडांमध्ये मोठा फरक आढळतो. कास पठारावर असणारी जांभळांची झाडं ही खुजी आहेत तर सपाटीवर येणारी झाडं उंच आहेत. पठारावर असणाऱ्या झाडांना उन आणि पाऊस याबरोबरचं वाऱ्याचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांची उंची कमीच राहते. या उलट डोंगराच्या आडून येणाऱ्या वाऱ्याचा फारसा वेग सपाटीच्या झाडांना लागत नसल्यामुळे तिथली झाडं उंच होतात.

आपल्याकडे वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनौषधी आणि वनउपज असलेली फळझाडंही आहेत. वनांमध्ये मुबलक असणाऱ्या या समृध्दीचा उपयोग अद्यापही आपल्याकडे होताना आढळत नाही. यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.- सुनिल भोईटे,पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :DamधरणWaterपाणीSatara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण