शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कीटकांच्या दोन नव्या प्रजातींचा सिंधुदुर्गात अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 5:24 PM

environment Sindhudurg : प्रामुख्याने ईशान्येकडे आढळणारा चतूर आणि केरळमध्येच अधिवास असणाऱ्या टाचणी या किटकांच्या दोन नव्या प्रजाती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये हा चतूर आढळून आला आहे. यामुळे पश्चिम घाटातील या जिल्ह्याला जैववैविध्यतेची खाण समजली जात आहे.

ठळक मुद्देकीटकांच्या दोन नव्या प्रजातींचा सिंधुदुर्गात अधिवास कोकणातील संशोधकांचे संशोधन : ईशान्येतील चतुर, केरळच्या टाचणीचा समावेश

संदीप आडनाईककोल्हापूर : प्रामुख्याने ईशान्येकडे आढळणारा चतूर आणि केरळमध्येच अधिवास असणाऱ्या टाचणी या किटकांच्या दोन नव्या प्रजाती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये हा चतूर आढळून आला आहे. यामुळे पश्चिम घाटातील या जिल्ह्याला जैववैविध्यतेची खाण समजली जात आहे.'ओडोनाटा' ही उडणाऱ्या किटकांच्या कुळातील टाचणी आणि चतुरांचा समावेश जैवविविधतेची खाण असणाऱ्या पश्चिम घाटामध्ये झाला आहे. 'ओडोनाटा'च्या १७४ प्रजाती असून त्यापैकी ५६ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. या प्रजातींमधील एकूण १३४ प्रजातींची नोंद महाराष्ट्रात होती, आता यामध्ये या दोन प्रजातींची भर पडली आहे. 'अ‍ॅग्रिओक्नेमिस केरेलेन्सिस' या टाचणीची आणि 'गायनाकँथा खासियाका' या चतूरच्या प्रजातीची महाराष्ट्रामधूून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांमध्ये या दोन्ही प्रजाती आढळल्या आहेत.कुडाळ येथील 'संत राऊळ महाराज महाविद्यालया'चे सहायक प्राध्यापक योगेश कोळी, विद्यार्थी अक्षय दळवी आणि संशोधक डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी या नोंदी केल्या आहेत. याची माहिती 'जर्नल ऑफ थ्रेटंड टाक्सा'मध्ये या शोधप्रबंध प्रसिद्ध करणाऱ्या प्रसिद्ध नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे.टाचणी ( 'अ‍ॅग्रिओक्नेमिस केरालेन्सिस') : ही प्रजात मुख्यत्वे केरळमध्ये आढळते. मात्र, प्रथमच कुडाळ तालुक्यामधील ठाकूरवाडी पाणथळ, बांबुळी आणि चिपी विमानतळाच्या पठारावर ती आढळल्याची माहिती डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी दिली. यामुळे पश्चिम घाटामधील या प्रजातीचे उत्तरेकडील अधिवास क्षेत्र या नोंदीमुळे अधोरेखित झाला आहे.चतुरा ( 'गायनाकँथा खासियाका') : ही प्रजात प्रामुख्याने ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमधील किनारी प्रदेशात आढळते. मात्र, ती प्रथमच सावंतवाडीमधील माजगावमध्ये आढळली. येथे रात्रीच्या वेळी निरीक्षण करत असताना प्रकाशझोतावर हा चतूर आढळल्याची माहिती संशोधक अक्षय दळवी यांनी दिली. निरीक्षणाअंती या प्रजातीच्या नमुन्यावरून याची ओळख निश्चित करण्यात आली. चतुराचा अधिवास ईशान्य भारतापुरताच मर्यादित असल्याचे मानला जातो. मात्र, त्याची नोंद आता पश्चिम घाटामध्ये झाल्याने याचे वेगळेच महत्त्व आहे. ही राज्यातील पहिलीच नोंद आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणkudal-acकुडाळSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर