शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे कसे; जमेल तिथे बांधली घरटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 11:50 AM

अस्तित्वासाठी स्वीकारला ‘ॲडाप्टेशन’चा नियम

- निशांत वानखेडेनागपूर :  लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये  ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना आई अंगणात वावरणाऱ्या चिऊताईला सहज दाखवायची. परंतु, आज ही चिऊताई दिसेनासी झाली आहे. माणसांमध्ये न भिता, बिनधास्त वावरणारी चिऊताई अचानक माणसांना सोडून कुठे फुर्र झाली आहे, असे वाटते ना. पण नाही, ती कुठे गेली नाही, फक्त बस्तान बदलवले आहे. माणसांनी निर्माण केलेल्या परिस्थितीवर मात करत ती पण जगायला शिकली आहे. शास्त्रीय भाषेत चिमण्यांनी ‘ॲडाप्टेशन’ स्वीकारले आहे. तज्ज्ञांच्या मते चिमण्यांनी नवा अधिवास स्वीकारला आहे. चिमणी हा जगभरात सर्वाधिक आवडणारा पक्षी आहे. तसा ताे भारतातही सर्वश्रूत आहे. ॲडाप्टेशन म्हणजे असलेल्या परिस्थितीत स्वत:मध्ये शारीरिक व बाह्य बदल करून जगणे हाेय. माणसांप्रमाणे चिमण्यांनीही ताे नियम स्वीकारल्याचे तज्ज्ञांनी अभ्यासातून मांडले आहे. आधीपासून माणसांमध्ये राहणे, हासुद्धा त्याचाच प्रकार आहे. कृत्रिम घरटी, प्लास्टिक पाईप्सपक्षी अभ्यासक डाॅ. आशिष टिपले यांच्या मते इतर प्राण्यांप्रमाणे चिमण्यांनीही स्वत:ला ॲडाप्ट केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात विद्याभारती काॅलेजतर्फे १०० घरटी सेलू शहरात वितरित केली व ती व्यापणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास केला. यामध्ये चिमण्यांनी सर्वाधिक अधिवास जमविला, पिल्ले जन्माला घातली. याशिवाय घराच्या परसबागेत, झाडांवरही त्यांनी बस्तान बसविले आहे. एवढेच नाही तर घरातील अडगळीची जागा किंवा प्लास्टिकच्या पाईपमध्येही चिमण्यांचे बस्तान दिसून येते. डाॅ. आशिष टिपले यांनी स्वत:च्या घरी ‘बर्ड फिडर’ लावले आहे. त्यात धान्य टाकलेले असते. पक्ष्यांना धान्य टिपण्याची व्यवस्था असते. येथील धान्य टिपण्यासाठी चिमण्यांची दिवसभर गर्दी राहत असल्याचे त्यांनी सांगितले.गाव, शहराच्या वेशीवरमहाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी महत्त्वाचे निरीक्षण नाेंदविले आहे. चिमण्या एका वर्षात तीन ते चार वेळा अंडी देतात. मिलन काळात मातीत अंघोळ करतात. घरटी करण्यासाठी गवत व नैसर्गिक साहित्य जर असेल तर ‘अंड्यां’चे नैसर्गिकरीत्या तापमान नियमन होते. शहरात माती, गवत, काडीकचरा मिळत नसल्याने त्यांनी शहराच्या वेशीवर बस्तान मांडले आहे.पक्षीप्रेमी डाॅ. पिंपळापुरे यांच्या मते चिमण्यांच्या संवर्धनासाठी शास्त्रीय अभ्यास आवश्यक आहे.चिमण्यांची गणना हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या काेणत्या भागात, किती प्रमाणात दिसतात, त्यांची घरटी कुठेकुठे आहेत, याचा अंदाज घेता येईल.