शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्र आता संवर्धन राखीव वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 20:21 IST

कोल्हापूर वन विभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना राज्य सरकारने आता 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत वन्यजीवांचा प्रामुख्याने वाघांचा कॉरिडॉर कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ हजार ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.

ठळक मुद्देवन्यजीव मंडळाचा निर्णय, वाघांचा कॉरिडॉर सुरक्षित पन्हाळा, विशाळगड, गगनबावडा, आंबोली, मायणीचा समावेश

संदीप आडनाईक

मुंबई/कोल्हापूर- कोल्हापूर वन विभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना राज्य सरकारने आता 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत वन्यजीवांचा प्रामुख्याने वाघांचा कॉरिडॉर कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ हजार ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत या प्रस्तावाला ही मंजूरी मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रांसह सात वनक्षेत्रांचा समावेश आहे. ही माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांनी दिली.

सह्याद्रीमधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण

९,३२४ हेक्टरमधील विशाळगड ७,२९१ हेक्टरमधील पन्हाळा, १0,५४८ हेक्टरमधील गगनबावडा, २४, ६६३ हेक्टरमधील आजरा-भुदरगड २२,५२३ हेक्टरमधील चंदगड, सातारा जिल्ह्यातील ६,५११ हेक्टरमधील जोर-जांभळी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ५६९२ हेक्टरमधील आंबोली-दोडामार्ग येथील वनक्षेत्रांना 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा देण्याचा प्रस्ताव कोल्हापूर वन विभागाने राज्य सरकारला पाठवला होता. आज झालेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली. यामुळे सह्याद्रीच्या वनक्षेत्रामधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण मिळाले आहे. याशिवाय साताऱ्याजवळील ८६६ हेक्टरमधील मायणी पक्षी अभयारण्यालाही या 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा देण्यात आले आहे.

राखीव वनक्षेत्रांमधील जागा या वन कायद्याअंतर्गत संरक्षित होतात, तर 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये आरक्षित केलेल्या जागा या 'वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२'अंतर्गत संरक्षित होतात. त्यामुळे अशा जागांना राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण मिळाले आहे.- सुहास वायंगणकर,सदस्य, राज्य वन्य जीव मंडळ.

 

टॅग्स :environmentपर्यावरणforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरSangliसांगलीsindhudurgसिंधुदुर्ग