शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खाम ‘नदी’ उरली केवळ ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:42 PM

निर्धोक सांडपाणी येत असल्याने खाम नदी सांडपाणी वाहून नेणारा बनला नाला बनली आहे

ठळक मुद्देसांडपाण्याने घोटला खाम नदीचा गळा१७ लाख - औरंगाबाद शहराची सध्याची लोकसंख्या २५० एमएलडी (दलघमी) पाण्याची रोज गरज१४० एमएलडी पाण्याचा पुरवठा११० एमएलडी दररोज सांडपाणी निर्मिती

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : मैलायुक्त सांडपाणी, कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी या सर्वांमुळे औरंगाबाद शहर ज्या नदीच्या काठावर वसले आहे ती खाम ‘नदी’ केवळ एक गटार, नाला किंवा ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून उरली आहे. यामुळे नदीमध्ये एकेकाळी स्वच्छंदपणे फिरणारे मासे, विविध वनस्पतींचे सौंदर्यही नामशेष झाले असून, शहराच्या सांडपाण्याने जणू खाम नदीचा गळा घोटला आहे.

शहराची सध्याची लोकसंख्या १७ लाखांच्या आसपास आहे. येथील नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दररोज २५० एमएलडी (दक्षलक्ष घनमीटर) पाणी लागते. यापैकी १४० एमएलडी पाण्याचा पुरवठा शहराला जायकवाडी धरणातून केला जातो. शहरातून दररोज अंदाजे ११० एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होते. सांडपाण्याची आवक आणि प्रकिया करणाऱ्या यंत्रांची क्षमता यात मोठी तफावत आहे. झाल्टा आणि सलीम अली सरोवर येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा पूर्णपणे अकार्यक्षम आहे. मलिक अंबर यांनी त्याकाळी जलव्यवस्थापनात निर्माण केलेले स्वच्छ पाण्याचे खंदक आता सांडपाणी वाहून नेणारे नाले बनले आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत शहराचे सांडपाणी विभागले जाते. पूर्वेकडचे पाणी नाल्यांमधून सुकना नदीला मिळते. पुढे दुधनेला आणि तेथून ते गोदावरीला मिळते.

त्याचप्रमाणे पश्चिम भागातील सांडपाणी खाम नदीद्वारे जोगेश्वरी गावाजवळ गोदावरीला मिळते. तेथून खाली अवघ्या २२ ते २३ किलोमीटर अंतरावरून हे पाणी नदीलगतच्या गावातील लोकांकडून वापरले जाते. पैठण, जालना, औरंगाबाद या मोठ्या शहरांव्यतिरिक्त जवळपास २५० पेक्षाही अधिक गावे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरीवर अवलंबून आहेत. शहरातील सलीम अली सरोवर येथेही त्या भागातील काही वॉर्डांतील सांडपाणी मिसळले जाते. हे पाणी प्रक्रिया करून सोडले जाते, असा प्रशासनाचा दावा असला तरी अत्यंत कमी क्षमता असणाऱ्या या प्रकल्पातून काय गुणवत्तेचे सांडपाणी निर्माण होत असेल, याबाबत पर्यावरणप्रेमींमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सांडपाण्यातून उत्पन्न प्रक्रिया केलेले सांडपाणी रस्ते कामासाठी वापरले जाते. सध्या शहराजवळ सुरू असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा उपयोग केला जात आहे. 6-8 महिन्यांत औरंगाबाद महानगरपालिकेला १५ ते १८ लाख रुपयांचा नफा होतो. प्रक्रिया केलेले उर्वरित सांडपाणी नक्षत्रवाडी परिसरातील नाल्यामध्ये सोडले जाते. तेथून पुढे ते गोदावरीला मिळते.

यापेक्षा सेप्टिक टँक बरेसध्या वापरण्यात येणाऱ्या ड्रेनेज पद्धतीपेक्षा पूर्वीची सेप्टिक टँकची पद्धत योग्य होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्या पद्धतीमध्ये निदान प्रत्येक घरात निर्माण होणारा मैला थेट कोणत्याही नदीत मिसळला जात नव्हता. घराखालच्या खड्ड्यात तो जमा व्हायचा, प्रसंगी शेतकऱ्यांकडून तो खत म्हणूनही नेला जायचा. त्यामुळे ती पद्धत अधिक पर्यावरणपूरकही होती.- विजय दिवाण, पर्यावरणतज्ज्ञ

जैवविविधतेवर परिणाम सलीम अली सरोवरात अनेक कमळे उमललेली दिसायची. प्रदूषणामुळे येथे कमळे फुलणे बंद झाले आहे. आता तेथे केवळ जलपर्णी आहेत. सूक्ष्म स्तरावर तर बदल झाले आहेत. अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे जैवसाखळीवरही परिणाम झाला आहे. रोटीफर हा एक प्राणी प्लवक आहे. तो या सरोवरात मोठ्या प्रमाणावर आढळतो. पर्यावरणाच्या दृष्टीने ते हानिकारक आहे. - प्रा. क्षमा खोब्रागडे, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाriverनदीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण