शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival 2019 : बदलता गणेशोत्सव आणि सामाजिक पर्यावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 10:28 IST

गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले.

यादव तरटे पाटील

अमरावती - गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. मात्र, या गणेशोत्सवाचे स्वरूप आणि त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलला आहे. काही अपवाद वगळता या उत्सवाच्या उपयुक्ततेकडे आपले सपशेल दुर्लक्ष झाले आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा शिरकाव होय. त्यातून निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या समस्या म्हणजे एक वेगळेच आवाहन आपल्या समोर निर्माण झाले आहे. सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकॉल आणि विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर तसेच रासायनिक रंगाचा वापर, अतिरेकी गुलाल उधळण या सर्व प्रकारामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

ज्या भावनेतून गणेशोत्सवाची निर्मिती झाली त्याच समाजाचे आरोग्यही यातून धोक्यात येत आहे. आपल्या अतिशय महत्त्वाच्या मुख्य गरजा म्हणजे प्राणवायू, प्राणी आणि अन्न... आणि याच नेमक्या धोक्यात येत आहेत. गणेशोत्सवातून होणारे जल, ध्वनी आणि हवेचे प्रदूषण यामुळे केवळ आपलेच नाही तर पृथ्वीचे आरोग्यसुद्धा धोक्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्ती आपल्याला दिसतात. हे बघून कोण्याही गणेशभक्ताचे मन उद्विग्न झाल्याशिवाय राहणार नाही.

रासायनिक रंग अधिक भयंकर

रासायनिक रंगांनी मूर्ती रंगवल्या जातात हे अधिक भयंकर वास्तव आहे. जल, ध्वनि प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो आहे.मूत्रसंस्थेचे कार्य, डोळ्यांचे विकार, कर्करोग तर अनेक त्वचेचे आजारदेखील यातून संभवतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पाणी प्रदूषित होतेच. शिवाय मातीचा पोतही खराब होतो.

(लेखक दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत)

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवenvironmentपर्यावरण