प्लॅस्टिक विल्हेवाटीची परिणामकारक पद्धती; जाणून घ्या, नक्की फायदा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:54 IST2020-01-29T17:24:24+5:302020-01-30T14:54:09+5:30

9400 टन प्लॅस्टिक हे कुठेही टाकले जात असल्याने दररोज माती, नाले आणि भूजल स्त्रोत प्रदूषित होतात.

Effective methods of plastic disposal | प्लॅस्टिक विल्हेवाटीची परिणामकारक पद्धती; जाणून घ्या, नक्की फायदा होईल!

प्लॅस्टिक विल्हेवाटीची परिणामकारक पद्धती; जाणून घ्या, नक्की फायदा होईल!

जगभरात काही टनांमध्ये प्लॅस्टिकचा वापर होत आहे आणि त्या वापरलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट पर्यावरणास अनुकूल नसलेल्या मार्गाने करण्यात येत असल्याचा समज आहे. एका अभ्यासानुसार भारतात वर्षाला 9.4 दशलक्ष टन प्लॅस्टिकचा वापर केला जातो. यापैकी जवळपास 5.6 दशलक्ष टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाते. तर उरलेले 3.8 दशलक्ष टन प्लॅस्टिक इतरत्र फेकले जाते. याचाच अर्थ 9400 टन प्लॅस्टिक हे कुठेही टाकले जात असल्याने दररोज माती, नाले आणि भूजल स्त्रोत प्रदूषित होतात.

प्लॅस्टिकची विल्हेवाट लावून त्याचा पुनर्वापर करणे हाच एक योग्य पर्याय आहे आणि भारतात याला मोठा वाव आहे. भारतात सध्याच्या घडीला 33 हजार पुनर्प्रक्रिया प्रकल्प आहेत. उद्योग वाढल्यामुळे रोजगाराच्या बर्‍याच संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच पुनर्प्रक्रिया उद्योगामध्ये सध्या 40 लाख लोक काम करत आहेत. त्यांचा उद्देश हा पुनर्वापरासाठी प्लॅस्टिक गोळा करणे हाच आहे. त्यामुळे पर्यावरणाला मदत करण्याशिवाय नोकरीच्या लाखो संधी निर्माण होऊ शकणार आहेत. 

प्लॅस्टिक वेगवेगळं करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्याची शपथ तुम्ही घेता का?

हो (103 votes)
नाही (20 votes)

Total Votes: 123

VOTEBack to voteView Results



पण प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याची कल्पना अद्याप देशवासियांमध्ये रुजलेली नाही. सद्य: स्थिती अशी आहे की सर्व कचरा एकाच वेळी गोळा केला जातो. सर्व प्रकारच्या कचर्‍यासाठी एकच पिशवी वापरली जाते. जेव्हा हा कचरा गोळा केला जातो तेव्हा तेथे कोणतेही विभाजन केले जात नाही. तसाच हा कचरा जमिनीवर टाकला जातो. यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. जमिनीमध्ये मिसळलेला कचरा विषारी पदार्थ मातीमध्ये टाकतो यामुळे तिच्या सुपिकतेवर परिणाम होत आहे. 

या समस्येच्या निराकरणासाठी आम्हाला कचरा व्यवस्थापनाची एक कार्यक्षम आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. परंतु जेव्हा आपण आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सवय बदलू तेव्हाच हे शक्य होईल. याची सुरूवात आधी आपल्याच घरापासून करायला हवी. कारण घरे हीच सर्वाधिक प्लॅस्टिक कचरा निर्माण करतात. 

पहिली पायरी म्हणजे कचर्‍याचे स्त्रोत विभाजन करणे, हा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या विभाजनामुळे कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे विभाजन होईल आणि प्रमाणही कमी होईल. विल्हेवाट लावण्यापूर्वी, प्लॅस्टिक कचरा प्रथम स्वच्छ करून वेगळ्या डब्यात ठेवावा. हा कचरा नंतर स्थानिक कचरा गोळा करणारे किंवा घरकाम करणार्‍या कर्मचार्‍यांद्वारे पुनर्वापरासाठी पाठवावा. अशा प्रकारे कचरा विल्हेवाट लावण्याची पद्धतशीर प्रक्रिया निर्माण होईल.

यामुळे केवळ कचरा व्यवस्थापन सोपे होते एवढेच नाही तर पर्यावरणाला अनुकूलही ठरते. कचराभूमीवर कमी कचरा गेल्याने आपसूकच प्रदूषणही कमी होते. शिवाय पुनर्वापर प्रक्रियेचे फायदेही आहेत. ते परवडणारे तर आहेच पण, कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइडची निर्मितीही रोखते. तसेच जीवाश्म इंधनाचा वापरही कमी करते. 

पर्यावरणास अनुकूल अशी कचरा विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया स्थापित करणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी बिसलेरी कंपनीने 'बॉटल्स फॉर चेंज' ही मोहिम सुरू केली आहे. नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्लास्टिक कचर्‍याचा पुनर्वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून नजीकच्या कबाड्याशी संपर्क साधता येणार आहे. यानंतर तो येऊन प्लॅस्टिक कचरा गोळा करणार आहे. 

हा उचललेला कचरा कंपनीने नियुक्त केलेल्या संस्थेकडे जमा केला जाणार आहे. यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येईल. हा उपक्रम दिल्ली, चेन्नई आणि बेंगळुरुसारख्या शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कंपन्या नावनोंदणी करू शकणार आहेत. या द्वारे आम्ही सुलभ कचरा पुनर्वापर प्रक्रियाचा नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहोत.

Web Title: Effective methods of plastic disposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.