वनविभागाने तयार केली बिया असलेली दिनदर्शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 17:10 IST2021-03-09T17:07:52+5:302021-03-09T17:10:26+5:30
environment forest Department kolhapur- कार्यालयात ठेवण्यासाठी हाताने बनवण्यात आलेल्या कागदाचा वापर करुन वन्यजीव विभागाने पर्यावरणस्नेही दिनदिर्शिका तयार केली असून यातील बियांचे कधीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका बनवण्यात आली असून यातून पर्यावरणाचा संदेशही देण्यात आला आहे.

वनविभागाने तयार केली बिया असलेली दिनदर्शिका
कोल्हापूर : कार्यालयात ठेवण्यासाठी हाताने बनवण्यात आलेल्या कागदाचा वापर करुन वन्यजीव विभागाने पर्यावरणस्नेही दिनदिर्शिका तयार केली असून यातील बियांचे कधीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका बनवण्यात आली असून यातून पर्यावरणाचा संदेशही देण्यात आला आहे.
दिनदर्शिकेच्या एका पानावर तीन महिने दर्शविले असून या प्रत्येक पानांमध्ये झेंडू, मिरची, कॉक्सकॉम्ब, ॲस्टर आणि बॅसिल या बियांचा समावेश आहे. महिना संपल्यानंतर ते पान फाडून जमिनीत त्याचे आहे तसेच रोपण करता येते. लवकर येणाऱ्या झाडांचा यात समावेश आहे.
या वर्षाची दिनदर्शिका तयार करताना त्याद्वारे इंधन, पाणी आणि वीज वाचवण्याचाही संदेश देण्यात आला आहे. आणि सेंद्रिय खत निर्मिती करा, असा पर्यावरण संदेशही संदेश देण्यात आला आहे. या प्रत्येक पानावर त्या बियांची माहितीही देण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या मागील बाजूला त्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
महिना संपल्यानंतर संबंधित महिन्याचे पान हे मातीमध्ये घालून त्याला पाणी दिल्यास त्यापासून संबंधित बियांचे रोपात रूपांतर होणार आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वन खात्याच्या वृक्षारोपण करा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याचा प्रयत्न विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी केला आहे.