शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सांगलीत कमळ पक्षाच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:06 PM

environment birds sanctuary : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक दिसला. शामरावनगरमधील दलदलीत किडे टिपताना पक्षीप्रेमींना त्याचे दर्शन झाले. सुमारे दहा वर्षांनंतर तो सांगलीत आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक ॲड. फिरोज तांबोळी यांनी दिली.

ठळक मुद्देसांगलीत कमळ पक्षाच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदलेसुमारे दहा वर्षांनंतर सांगलीत आढळला कमळ पक्षी

सांगली : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक दिसला. शामरावनगरमधील दलदलीत किडे टिपताना पक्षीप्रेमींना त्याचे दर्शन झाले. सुमारे दहा वर्षांनंतर तो सांगलीत आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक ॲड. फिरोज तांबोळी यांनी दिली.दलदलीची ठिकाणी कमी झाल्याने हा पक्षी शहरापासून दुरावला आहे. कृष्णेच्या काठावर कधीकधी दिसायचा, पण गेल्या दहा वर्षांत तो अचानक गायब झाला. गेल्या दोन वर्षांत शामरावनगरमध्ये पुराचे पाणी शिरुन बरीच दलदल निर्माण झाली आहे.

देशी व स्थलांतरीत विदेशी पक्ष्यांसाठी ही दलदल म्हणजे अन्न मिळविण्यासाठी हक्काची जागा ठरली आहे. ॲड. तांबोळी सहकाऱ्यांसमवेत तेथे पक्षी निरिक्षण करत असताना कमळ पक्ष्यांचा थवा दिसला. आठ ते दहा पक्षी गेल्या काही दिवसांपासून तेथे येत असावेत असे तांबोळी म्हणाले. लांब शेपटीचा कमळ पक्षी अत्यंत देखणा व सभ्य पक्षी मानला जातो.

टॅग्स :environmentपर्यावरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यSangliसांगली