मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दुप्पट म्हणजेच 12 के एल अतिरिक्त क्षमतेचा ऑक्सिजनचा टँक उपलब्ध केल्याने सर्व रुग्णांना दिलासा मिळला आहे. ...
पवित्र रमजान ईदच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या मुस्लिम बांधवांसाठी मिरजेतील हयात फाऊंडेशनने तब्बल ५ हजार लिटरचा शिरखुर्मा तयार केला. शहरातील चार हजार कुटूंबांना घरोघरी पोहोच केला. कोरोनाची महामारी अणि लॉकडाऊनच्या संकटात दोनवेळच्या जेवणालाही महाग झाल ...
मिरजेतील होळीकट्टा परिसरातील ६८ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिका आरोग्य विभागाने या महिलेचे नातेवाईक व संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले. मिरजेत पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने महापालिका व पोलीस ...
कोरोना विषाणूपासून गर्दीव्दारे संसर्ग होऊ नये याकरीता उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश जारी केला आहे. ...
कोरोना साथीमुळे जिल्ह्यातील जत्रा-यात्रा आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम संकटात सापडले आहेत. मिरजेच्या उरूसासह गर्दीचे सर्व कार्यक्रम स्थगित ठेवण्याचे किंवा पुढे ढकलण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. महिला दिनानिमित्त ८ मार्चला मोठ्या प्रमाणात कार ...
मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव ...