Strange accident near Sangola; Three died on the spot, two were injured | सांगोल्याजवळ विचित्र अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
सांगोल्याजवळ विचित्र अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

ठळक मुद्दे- दोन पिकअप ट्रकची समोरासमोर धडक- दुचाकीस्वार मध्येच आल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू- अपघातस्थळी पोलीसांचे पथक दाखल

सोलापूर/ सांगोला : सांगोला रोडवरून येणाºया व मिरज रोडवरून येणाºया दोन्ही पिकअपची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार मध्येच आल्याने दुचाकीवरील दोघांचा तर पिकअपमधील एकाचा अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, हा अपघात सांगोला- मिरज रोडवर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी मिरज येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर सांगोला-मिरज मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
 

Web Title: Strange accident near Sangola; Three died on the spot, two were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.