राजकारणी कोणत्या गोष्टीचा कशासाठी उपयोग करून घेतील, ते कधीच सांगता येत नाही. रविवारी आलेल्या कोजागरी पौर्णिमेचा उपयोगदेखील काही उमेदवारांकडून अत्यंत कौशल्याने करण्यात येणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता मध्यावर येऊन पोहोचला असून, अवघा एक आठवडा हाती उरल्याने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी १३ ऑक्टोबर हा शेवटचा रविवार (सुटीचा दिवस) आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व पक्षाने याला प्रचाराचा सुपर संडे बनवण्यासाठी कंबर कसली आहे. ...
नाशिक ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी गुरुवार (दि.२४) रात्री १२ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात मुंबई शस्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत. ...
शहरातील चारही मतदारसंघात युती आणि आघाडीचे उमेदवार रिंगणात असले तरी सर्वच पक्षांची नजर ही मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर आहे, काही मतदारसंघात स्पर्धक उमेदवाराच्या पक्षांतर्गत नाराजीदेखील पथ्यावर पाडून घेण्याची स्पर्धा सुरू आहे. ...
संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. ...
बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले. ...