विजयसिंहांसारख्या तरुणांच्या हातात सत्ता देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:08 AM2019-10-13T00:08:17+5:302019-10-13T00:09:03+5:30

बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या कार्यकाळात विजयसिंह पंडित यांनी अध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली.

Will give power to the youth like Vijay Singh | विजयसिंहांसारख्या तरुणांच्या हातात सत्ता देणार

विजयसिंहांसारख्या तरुणांच्या हातात सत्ता देणार

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पवार । गेवराईच्या सभेत आवाहन; सत्तेचा वापर विकासासाठी करणार

गेवराई : बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या कार्यकाळात विजयसिंह पंडित यांनी अध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली. जिल्ह्याचे हित जपण्याचे महत्वपूर्ण काम केले, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले अध्यक्षपद त्यांनी यशस्वी आणि दैदिप्यमान काम करुन लोककल्याणाचा वसा जपला. तालुक्याच्या विकासासाठी त्यांना सत्तेचा वापर करायचा आहे, ते पदासाठी नव्हे तर जनतेच्या भल्यासाठी विकास योजना राबविण्यासाठी लढत आहेत, अशा विजयसिंह सारख्या युवकांच्या हातात मला महाराष्ट्राची सत्ता देवुन यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी विजयसिंह पंडित यांना हजारोंच्या मताने विधानसभेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मतदारांना केले.
गेवराई मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेच्या व्यासपीठावर शरद पवार, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी. आ.अमरसिंह पंडित, उमेदवार विजयसिंह पंडित, माजी आ. उषा दराडे आदि उपस्थित होते.
आमदारकी शब्द लावुन मला मिरवायचे नाही तर या गेवराई तालुक्यातील लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी आणि तरुणांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी मला आशिर्वाद द्या, असे आवाहन यावेळी बोलतांना विजयसिंह पंडित यांनी केले.
यावेळी विजयसिंह म्हणाले, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्याच्या सिंदफणा खोऱ्यात साखळी बंधारे बांधणे, गेवराई एमआयडीसीचा प्रश्न सोडवणे, सोलापूर - जळगांव रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणे यासाठी सेवा करण्याची संधी द्या. विद्यमान प्रतिनिधीनीं लोकांना गृहीत धरुन सत्ता मिळविली. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, चुकीच्या आणेवारीमुळे शेतक-यांना पिकविमा यापुढे मिळणार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. मला संधी द्या, तुम्हाला कधीही नाऊमेद होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Web Title: Will give power to the youth like Vijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.