परीक्षेपूर्वी आई गेली, वडिलांनी खंबीर साथ दिली; अंकिता चौधरी यांची IAS पदाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 18:47 IST2025-06-01T18:47:15+5:302025-06-01T18:47:41+5:30
Success Story: दुसऱ्याच प्रयत्नात देशभरात 14वा क्रमांक मिळवून अंकिता चौधरी IAS अधिकारी झाल्या.

परीक्षेपूर्वी आई गेली, वडिलांनी खंबीर साथ दिली; अंकिता चौधरी यांची IAS पदाला गवसणी
UPSC Success Story:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही देशातील सर्वात कठीण स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC नागरी सेवा परीक्षा देतात, परंतु फार कमी विद्यार्थी यशस्वी होऊन सरकारी अधिकारी बनतात. अशाच एका UPSC उमेदवाराबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जो पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला, पण त्याने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न केला अन् दुसऱ्या प्रयत्नात देशभरात 14 वी रँक मिळवत IAS पदाला गवसणी घातली.
IAS अंकिता चौधरी
हरियाणाच्या रोहतास जिल्ह्यातील रहिवासी अंकिता चौधरी यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील साखर कारखान्यात अकाउंटंट म्हणून काम करत होते. अंकिता लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणातच झाले, त्यानंतर पदवीसाठी दिल्लीला आल्या. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेज (DU) मधून पदवी मिळवली. पदवीनंतर अंकिताने आयआयटी दिल्लीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
परीक्षेपूर्वी आईचे निधन
अंकिता यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच यूपीएससी सीएसईची तयारी सुरू केली. पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्या यूपीएससी परीक्षा देण्यासाठी तयार होत्या, परंतु यूपीएससी सीएसईची तयारी करत असताना त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूचा त्यांच्यावर खूप खोलवर परिणाम झाला, परंतु त्यांनी हिंमत गमावली नाही. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोमाने अभ्यास सुरू ठेवला. वडिलांनी या प्रवासात पूर्ण साथ दिली.
दुसऱ्या प्रयत्नात AIR 14 रँक मिळवली
अंकित यांनी 2017 मध्ये यूपीएससीचा पहिला प्रयत्न दिला, परंतु पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्या. 2018 मध्ये दुसरा प्रयत्न केला अन् यूपीएससी सीएसई परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांनी देशभरात 14 वा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनल्या. अंकिता चौधरी यांचे यश हे सर्व यूपीएससी उमेदवारांसाठी प्रेरणादायी आहे.