जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:55 IST2025-04-29T17:50:47+5:302025-04-29T17:55:41+5:30

UPSC Ravi Raj Story Success Story: रवी राज यांची अंधत्वावर मात; 2024 च्या UPSC परीक्षेत 182वा क्रमांक मिळवून बनले IAS अधिकारी.

UPSC Ravi Raj Story Success Story: Mother used to make notes and read them | जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

UPSC Ravi Raj Story Success Story: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024चा अंतिम निकाल 22 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. एकूण 1009 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. उतीर्ण झालेल्या अनेक उमेदवारांची सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला अशा उमेदवाराबद्दल सांगणार आहोत, ज्याने या परीक्षेत 182वा क्रमांक मिळवून IAS पदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, हा उमेदवार पाहू शकत नाही. आपल्या व्यंगावर मात करत त्याने देशातील सर्वात कठीण परीक्षा उतीर्ण केली आहे. 

एका आजाराने दृष्टी गेली...
बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रहिवासी रवी राज(वय 24 वर्षे) याने आपले संपूर्ण शिक्षण नवादा येथून पूर्ण केले. त्याला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. दहावीत असताना एका आजारामुळे त्याची दृष्टी पूर्णपणे गेली. पण, रवीने कधीच या अंधत्वाला आपल्या यशाच्या वाटेत येऊ दिले नाही. पदवीनंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली अन् चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. 

BPSC परीक्षा उत्तीर्ण, पण नोकरीला रुजू झाला नाही
विशेष म्हणजे, रवीने नोव्हेंबर 2024 मध्ये बिहार लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षादेखील उत्तीर्ण केली होती. त्या परीक्षेतून त्याची महसूल अधिकारी पदासाठी निवड झाली, परंतु UPSC चा अभ्यास करण्यासाठी नोकरीत रुजू झाला नाही. तीन वेळा यूपीएससीमध्ये नापास झाल्यानंतरही रवीने हार मानली नाही. प्रत्येक पराभवानंतर त्याने नव्याने तयारी केली अन् चौथ्या प्रयत्नात थेट IAS पदाला गवसणी घातली.

आई नोट्स बनवायची, वाचून दाखवायची
रवी अंध असल्यामुळे त्याला सामान्य माणसांप्रमाणे लिहिता वाचता येत नाही. रिपोर्ट्सनुसार, रवीची आई त्याचा अभ्यास घ्यायची. रवीची आई पदवीधर आहे, तर वडील शेतकरी आहेत. आई रवीची पुस्तके वाचून नोट्स तयार करायची आणि त्याला वाचून दाखवायची. शिवाय रवीला YouTube वर अभ्यासाचे विविध व्हिडिओही लावून द्यायची अन् रवी ऐकायचा. रवी आपल्या आईच्या मदतीने दररोज 10 तास अभ्यास करायचा. अतिशय प्रतिकुल रवीने सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा पराक्रम केला आहे.

Web Title: UPSC Ravi Raj Story Success Story: Mother used to make notes and read them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.