सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:53 PM2024-04-15T17:53:07+5:302024-04-15T17:53:25+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे 827 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

UPSC for Medical Students: Golden Opportunity for Govt Jobs! Mega Recruitment by UPSC; Who can apply? see | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा...

UPSC CMS 2024 Exam: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे(UPSC) दरवर्षी विविध विभागातील पदे भरली जातात. या वर्षीदेखील युपीएससीने भरतीचा ओघ सुरुच ठेवला आहे. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले असेल आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फतसरकारीनोकरी मिळवण्याचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. UPSC ने जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात 827 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. Combined Medical Services (CMS) ने या भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
UPSC द्वारे वैद्यकीय क्षेत्रात सरकारीनोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना Combined Medical Services परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे, तर 14 जुलै 2024 रोजी परीक्षा होणार आहे.

असा करा अर्ज-
स्टेप 1: UPSC च्या अधिकृत वेबसाईट वर जा. upsconline.nic.in

स्टेप 2: OTR (वन टाइम रजिस्ट्रेशन) वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी  "New Registration" वर क्लिक करा.

स्टेप 3: तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी फॉर्म दिसेल. यानंतर, ओटीआर फॉर्ममध्ये नाव, पालकांचे नाव, बोर्ड परीक्षेचा रोल नंबर, जन्मतारीख इत्यादी भरा.

स्टेप 4: UPSC CMS नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी "सबमिट" बटणावर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्ज भरा-

स्टेप 1: तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी, मोबाइल नंबर किंवा ओटीआर आयडीसह पोर्टलवर लॉग इन करा.

स्टेप 2: सर्व आवश्यक तपशीलांसह UPSC CMS ऑनलाइन फॉर्म भरा.

स्टेप 3: फोटो आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

स्टेप 4: ऑनलाइन फॉर्ममध्ये भरलेले तपशील पुन्हा तपासा आणि नंतर फी जमा करा.

स्टेप 5: भविष्यातील संदर्भासाठी UPSC CMS ऑनलाइन अर्ज 2024 ची प्रिंटआउट घ्या.

परीक्षा फी
उमेदवार कोणत्याही SBI शाखेत रोख जमा करून किंवा नेट बँकिंग सुविधा/व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI द्वारे UPSC CMS अर्ज फी भरू शकतो. SC/ST/महिला/PWBD उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील. परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांनी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, 32 वर्षांपेक्षा जास्त वयाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.

Web Title: UPSC for Medical Students: Golden Opportunity for Govt Jobs! Mega Recruitment by UPSC; Who can apply? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.