UGC नं देशातील ३२ विद्यापीठांना ठरवलं बोगस; महाराष्ट्रातील २ विद्यापीठांचा समावेश, यादी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:26 IST2026-02-22T13:16:24+5:302026-02-22T13:26:53+5:30

एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी या शैक्षणिक संस्थेला मान्यता आहे की नाही याची पडताळणी करावी असा सल्ला यूजीसीने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिला आहे.

UGC declares 32 universities in the country as bogus; 2 universities from Maharashtra included, read the list | UGC नं देशातील ३२ विद्यापीठांना ठरवलं बोगस; महाराष्ट्रातील २ विद्यापीठांचा समावेश, यादी वाचा

UGC नं देशातील ३२ विद्यापीठांना ठरवलं बोगस; महाराष्ट्रातील २ विद्यापीठांचा समावेश, यादी वाचा

नवी दिल्ली - देशात बोगस आणि बनावट विद्यापीठांचा मोठा खुलासा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने संपूर्ण देशातील ३२ विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. या शैक्षणिक संस्थेत डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षण नाकारले जाईल असं आयोगाने स्पष्ट केले. UGC ने विद्यार्थ्यांना कुठल्याही कॉलेज अथवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची मान्यता तपासण्याचं आवाहन केले आहे. या ३२ विद्यापीठांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याने आयोगाने म्हटलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

UGC ने सांगितले आहे की, UGC ACT च्या कलम २(एफ) आणि ३ अंतर्गत केवळ मान्यता प्राप्त संस्थांना डिग्री देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या संस्थाव्यतिरिक्त इतर कुठल्याही बनावट विद्यापीठ अथवा संस्थेकडून घेतलेली डिग्री बेकायदेशीर ठरेल असं त्यांनी म्हटलं. यूजीसीच्या या यादीत दिल्लीत सर्वाधिक १२ विद्यापीठे बनावट असल्याचं पुढे आले आहे. दिल्लीनंतर उत्तर प्रदेशात ४ विद्यापीठांना बनावट ठरवण्यात आले आहे. इतर राज्यातही काही शिक्षण संस्था कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने माहिती दिली आहे.

'या' राज्यात किती बनावट विद्यापीठे?

दिल्ली - १२
उत्तर प्रदेश - ४
आंध्र प्रदेश - २
कर्नाटक - २
केरळ - २
महाराष्ट्र - २
पुदुच्चेरी - २
पश्चिम बंगाल - २
अरुणाचल  प्रदेश - १
हरियाणा - १
झारखंड - १
राजस्थान - १

विद्यार्थ्यांना दिला विशेष सल्ला

दरम्यान, यूजीसीने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विशेष सल्ला दिला आहे. एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी या शैक्षणिक संस्थेला मान्यता आहे की नाही याची पडताळणी करावी. बनावट विद्यापीठांमध्ये दाखला घेतल्यास विद्यार्थ्याचा वेळ, पैसा आणि करिअर तिन्ही गोष्टी खराब होऊ शकतात. देशात उच्च शिक्षणाचा वाढवा विस्तार पाहता अनेक संस्था विना परवाना विद्यापीठे बनवत आहेत. त्यामुळे अशा संस्थांपासून विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे. योग्य माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा असं यूजीसीने म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील २ विद्यापीठांचा समावेश 

यूजीसीच्या या ३२ बोगस विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील २ विद्यापीठांचा समावेश आहे. त्यात नागपूर येथील राजा अरबी विद्यापीठ आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे. 

राज्यनिहाय बनावट विद्यापीठांची यादी (एकूण ३२)

आंध्र प्रदेश (२)

  1. Christ New Testament Deemed University – Guntur

  2. Bible Open University of India – Visakhapatnam

अरुणाचल प्रदेश (१)

  1. Indian Institute of Alternative Medicine – Arunachal Pradesh

दिल्ली (१२)

  1. World Peace of United Nations University (WPUNU)

  2. Institute of Management and Engineering

  3. All India Institute of Public & Physical Health Sciences (AIIPHS)

  4. Commercial University Ltd., Daryaganj

  5. United Nations University

  6. Vocational University

  7. ADR-Centric Juridical University

  8. Indian Institute of Science and Engineering

  9. Viswakarma Open University for Self-Employment

  10. Adhyatmik Vishwavidyalaya (Spiritual University)

  11. National Institute of Management Solution

  12. Mountain Institute of Management & Technology

हरियाणा (१)

  1. Magic & Art University – Faridabad

झारखंड (१)

  1. Daksha University (Vocational and Life Skill Education) – Ranchi

कर्नाटक (२)

  1. Sarva Bharatiya Shiksha Peeth – Tumkur

  2. Global Human Peace University – Bengaluru

केरळ (२)

  1. International Islamic University of Prophetic Medicine (IIUPM) – Kozhikode

  2. St. John’s University – Kerala

महाराष्ट्र (२)

  1. Raja Arabic University – Nagpur

  2. National Backward Krushi Vidyapeeth – Solapur

पुदुच्चेरी (२)

  1. Usha Latchumanan College of Education – Puducherry

  2. Sree Bodhi Academy of Higher Education – Puducherry

राजस्थान (१)

  1. Rajeev Gandhi Institute of Technology & Management – Bhiwadi, Alwar

उत्तर प्रदेश (४)

  1. Gandhi Hindi Vidyapith – Prayagraj

  2. Netaji Subhash Chandra Bose University (Open University) – Aligarh

  3. Bhartiya Shiksha Parishad – Lucknow

  4. Mahamaya Technical University – Noida

पश्चिम बंगाल (२)

  1. Indian Institute of Alternative Medicine – Kolkata

  2. Institute of Alternative Medicine and Research – Kolkata

Web Title : यूजीसी ने 32 विश्वविद्यालयों को फर्जी घोषित किया; महाराष्ट्र के दो शामिल

Web Summary : यूजीसी ने महाराष्ट्र के दो सहित देशभर के 32 विश्वविद्यालयों को फर्जी घोषित किया। इन संस्थानों से डिग्री अमान्य है, जिससे नौकरी की संभावनाएं और आगे की शिक्षा प्रभावित होगी। छात्रों से आग्रह है कि वे नामांकन से पहले विश्वविद्यालय की मान्यता सत्यापित करें।

Web Title : UGC Declares 32 Universities Fake; Two from Maharashtra Included

Web Summary : UGC identified 32 fake universities nationwide, including two in Maharashtra. Degrees from these institutions are invalid, impacting job prospects and further education. Students are urged to verify university accreditation before enrolling to avoid wasted time, money, and compromised careers.