शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्राध्यापकांवर बिगारी काम करण्याची वेळ, भरती तातडीने सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:55 IST

Education News: पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत.

- चंद्रकांत दडसमुंबई : उच्च शिक्षित झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे ठरवून अनेकांनी नेट, सेट परीक्षा दिली. त्यानंतर संबंधित शाखांमधील पीएच.डी.ही संपादित केली. आता या पदवीमुळे तरी नोकरी नक्की लागेल या आशेवर असणाऱ्यांच्या अपेक्षा वास्तवात मात्र मातीमोल ठरल्या आहेत. पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे या पदव्या आमच्या काय कामाच्या, असा उद्विग्न सवाल पीएच.डी.प्राप्त नेट, सेटधारकांनी केला आहे.पीएच.डी. पदवी प्राप्त डॉ. अशोक उके औरंगाबाद येथील महाविद्यालयात सुरुवातीला तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून काम करीत होते. मात्र वर्षाकाठी मिळणाऱ्या अतिशय तुटपुंज्या मानधनामुळे ते सध्या मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करीत आहेत. प्राध्यापक म्हणून काम करीत होतो, त्यापेक्षा थोडे अधिक पैसे बिगारी म्हणून काम करताना शिल्लक राहतात, असेही उके यांनी सांगितले. कोल्हापुरातील गारगोटी तालुक्यातील एमलीब, नेट, सेट तसेच व्यवस्थापन पदविकेचे शिक्षण घेतलेल्या शैलेश देसाई यांनी अनेक वर्षे सीएचबी म्हणून तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये काम केले. मात्र हातात महिन्याकाठी केवळ ८ ते १० हजार रुपये येत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून ते फरशी फिटिंगचे काम करीत आहेत. पीएच.डी. पदवी घेतलेल्या बीड येथील डॉ. अशोक सारंगकर यांनीही नोकरी मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला असून, डॉ. भारतभूषण पंडित हे घरपोच आंबेविक्री करीत आहेत. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक प्राध्यपकांनी हाच मार्ग सध्या अनुसरला असून, त्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ प्राध्यापक भरती उठवून उच्चशिक्षित तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

प्राध्यापक भरती सुरू करण्यासंदर्भात अद्याप आदेश आलेले नाहीत. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यपकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव अद्याप आला नसून, आदेश आल्यानंतर त्याची कार्यवाही केली जाईल.- डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षणकोरोनाच्या काळामध्ये शासनाने नियमित प्राध्यापकांचे वेतन दरमहा अदा केलेले आहे; परंतु त्यांच्याप्रमाणेच काम करणारे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मात्र मानधनापासून वंचित आहेत.  राज्य सरकारने प्राध्यापक भरती तत्काळ सुरू करावी.- डॉ. किशोर खिलारे, राज्य समन्वयक, प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन

टॅग्स :jobनोकरीEducation Sectorशिक्षण क्षेत्र