सुप्रीम कोर्टात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 67 हजार महिना, लवकर करा अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 22:02 IST2024-12-06T22:01:58+5:302024-12-06T22:02:38+5:30
Supreme Court Recruitment 2024: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.

सुप्रीम कोर्टात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 67 हजार महिना, लवकर करा अर्ज...
Supreme Court Recruitment 2024: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधारकांसाठी मोठी संधी आहे. पदवीधारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 100 हून अधिक पदांसाठी अधिसूचना जारी केली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट sci.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 25 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
एकूण 107 पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे, त्यापैकी सर्वाधिक पदे गट ब पर्सनल असिस्टंट पदासाठी आहेत. तर, पर्सनल असिस्टंट पदासाठी एकूण 43 पदांसाठी भरती जाहीर केली आहे, तर सीनिअर पर्सनल असिस्टंट पदासाठी 33 आणि कोर्ट मास्टरच्या (शॉर्टहँड) 31 पदांसाठी भरती होणार आहे. कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) हे पद राजपत्रित अधिकारी पद आहे.
पात्रता निकष काय आहेत?
सुप्रीम कोर्टात या वेगवेगळ्या पदांवर भरतीसाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत. कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कायद्याची पदवी घेणे आवश्यक आहे. तर, सीनिअर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट पदासाठी उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असावा.
वयोमर्यादा- या पदांसाठी केवळ 30 ते 45 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया काय आहे?
या पदांसाठी निवड प्रक्रिया टायपिंग आणि शॉर्टहँड चाचणीसह कौशल्य चाचणीने सुरू होईल. त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अंतिम निवड प्रक्रिया म्हणून कागदपत्र पडताळणी आणि फिटनेस चाचणीदेखील घेतली जाईल.
पगार किती असेल?
कोर्ट मास्टर्स (शॉर्टहँड) – रुपये 67,700 प्रति महिना
सीनिअर पर्सनल असिस्टंट पदासाठी – 47,600 रुपये प्रति महिना
पर्सनल असिस्टंट- 44,900 रुपये प्रति महिना