शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा दाेन सत्रांत १५ दिवसांत शक्य, याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांचा शिक्षणमंत्र्यांसमोर प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 07:23 IST

SSC Exam Update: दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना, परीक्षा कशा घेऊ शकतो, यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.

मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यापेक्षा कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करून परीक्षांचे नियोजन केल्यास त्या शक्य आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांना, परीक्षा कशा घेऊ शकतो, यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. दहावीच्या परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर आणि २ सत्रांत केल्यास हे शक्य होऊ शकते, असे नियोजन त्यांनी मांडले आहे. कुलकर्णी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, शाळेतील दहावीची एकूण विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन त्यांची सकाळ आणि दुपार अशा दोन गटांत विभागणी करून परीक्षा घेतल्यास, गर्दी न होता १५ दिवसांत परीक्षा पार पाडली जाऊ शकते. तसेच परीक्षा केंद्रांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास शाळांकडून आवश्यक ती खबरदारी जबाबदारी म्हणून नक्कीच पार पाडली जाईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. परीक्षेसाठी खासगी वाहने तसेच आवश्यक अशी विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाऊ शकते, असे मतही त्यांनी मांडले. राज्य परीक्षा मंडळाला फक्त एकाच दिवसाच्या दोन सत्रांसाठी दोन विविध प्रश्नसंचांचा भार उचलावा लागू शकतो. तसेच यावेळी शाळेमध्ये केवळ परीक्षार्थी, संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांनाच प्रवेश दिला, तर नियोजन व्यवस्थित पार पडू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मूल्यांकन शाळास्तरावर  केल्यास प्रश्न सुटेल यंदाच्या वर्षासाठी शाळेतील उत्तरपत्रिकांचे शाळेतच मूल्यांकन केल्यास मूल्यांकनाचा प्रश्नही सुटू शकेल. जवळच्याच शाळेतील शिक्षकांना यंदा उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी सोपवून संगणकीय व्यवस्थेद्वारे केवळ सगळे गुण शिक्षण मंडळाकडे पोहोचवल्यास शिक्षकांनाही त्रास होणार नाही. अशाप्रकारे मूल्यांकन केल्यास १५ दिवसात निकाल लागेल आणि अकरावी प्रवेशप्रक्रियाही ऑगस्टपासून सुरू करता येईल, असा प्रस्ताव कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडला आहे 

प्रस्ताव असा...- परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर- विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- शाळेत परीक्षार्थी, संबंधित शिक्षकांना प्रवेश- उत्तरपत्रिकांचे शाळेतच मूल्यांकन-संगणकीय व्यवस्थेद्वारे सगळे गुण शिक्षण मंडळाकडे पोहाेचवणे

टॅग्स :ssc examदहावीEducationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाडMaharashtraमहाराष्ट्र