४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, पण मुंबईत शाळांची घंटा वाजणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 05:55 AM2021-09-26T05:55:11+5:302021-09-26T05:55:55+5:30

महापालिका शिक्षणाधिकारी सोमवारी सादर करणार प्रस्ताव.

Permission to start school from October 4 but when schools will reopen in mumbai bmc | ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, पण मुंबईत शाळांची घंटा वाजणार कधी?

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्देमहापालिका शिक्षणाधिकारी सोमवारी सादर करणार प्रस्ताव.

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयासाठी सोमवारी शिक्षण विभागाकडून आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

मुंबईतील शाळा सुरू करण्याआधी महापालिका शिक्षण विभागाकडून आवश्यक एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. २४ वॉर्डातील शाळांचे विभागीय सहायक आयुक्तांच्या मदतीने निर्जंतुकीकरण, मुलांना देण्यात येणाऱ्या मास्कची खरेदी, पालकांकडून घेण्यात येणारी संमती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण याची पूर्वतयारी झाल्याची माहिती त्यांनी दिली. शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबईतील  शाळांना लागू असल्याने आयुक्त शाळा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिक्षकांचे लसीकरण 
मुंबई महापालिका शाळांतील जवळपास ७३ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शाळा सुरू करण्यास परवानगी मिळालीच तर तोपर्यंत प्रामुख्याने ८ वी ते १० वी म्हणजेच माध्यमिकच्या शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी माहिती तडवी यांनी दिली. शाळांच्या निर्जंतुकीकरणाचे कामही लगेच होईल अशी तयारी त्यांनी दर्शविली आहे. विद्यार्थीसंख्या पाहून वर्ग एकदिवसाआड भरवायचे की कसे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

पालकांचे संमतीपत्र बंधनकारक

  • महापालिका शिक्षण विभागाकडून पालकांच्या संमतीपत्राचा नमुना बनवून घेण्यात आला असून पालकांनी हे संमतीपत्र दिले तरच विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहू शकणार आहेत. शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे पालक अजूनही धास्तावलेले असल्याने उपस्थितीची जबरदस्ती मुलांवर करता येणार नाही. 
  • ज्या विद्यार्थ्यांना यापुढेही काही दिवस आपले ऑनलाइन शिक्षणच सुरू ठेवायचे आहे, त्यांना त्याप्रमाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करता येणार असल्याचे तडवी यांनी सांगितले.

Web Title: Permission to start school from October 4 but when schools will reopen in mumbai bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.