“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा, निकाल 'मिशन मोड'वर”: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:36 IST2026-04-05T15:36:44+5:302026-04-05T15:36:44+5:30

Chandrakant Patil News: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश

minister chandrakant patil said exams results on mission mode to safeguard the academic interests of students | “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा, निकाल 'मिशन मोड'वर”: चंद्रकांत पाटील

“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा, निकाल 'मिशन मोड'वर”: चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil News: राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे.. विशेषतः लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत.

बाटु विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक आणि गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी,संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. तसेच या सर्व कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक महाविद्यालये व संस्थाचालकांनी विद्यापीठापासून विसंलग्निकरणाचीही मागणी केली आहे. या सर्व शैक्षणिक बाबींची विचार करून प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी  कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. 

विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये AI सज्ज 

परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती विद्यापीठात करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल समितीसह विविध शासकीय समित्यांवर काम केलेले आहे.या अनुभवातून  प्रभारी कुलगुरूंनी पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत. निकाल प्रक्रिया कालबद्ध करण्यासाठीपरीक्षा वेळेत घेऊन निकाल विहित मुदतीत जाहीर करण्याला सर्वोच्च प्राधान्य. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, सेंटर्स ऑफ एक्सलन्स, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील. यासाठी CSR निधी आणि शासकीय अनुदानातून तरतूद केली जाणार आहे. तसेच  प्रभारी कुलगुरूंना परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे हित राज्य शासनाचे सर्वोपरी असून, शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षा व निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्निकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title : छात्रों के शैक्षणिक हितों की रक्षा के लिए परीक्षा, परिणाम 'मिशन मोड' पर

Web Summary : राज्य सरकार डीबीएटीयू की परीक्षा और परिणाम प्रक्रियाओं को सुव्यवस्थित करने के लिए कदम उठा रही है। मंत्री चंद्रकांत पाटिल का लक्ष्य देरी को दूर करना, छात्रों के कल्याण को प्राथमिकता देना और एआई के साथ संबद्ध कॉलेजों का आधुनिकीकरण करना है। प्रयासों में अनुभवी नेतृत्व नियुक्त करना और उत्कृष्टता के लिए सार्वजनिक-निजी भागीदारी का पता लगाना शामिल है।

Web Title : Exams, results on 'mission mode' to protect students' academic interests.

Web Summary : The state government is taking steps to streamline DBATU's exam and result processes. Minister Chandrakant Patil aims to resolve delays, prioritize student welfare, and modernize affiliated colleges with AI. Efforts include appointing experienced leadership and exploring public-private partnerships for excellence.