₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 19:49 IST2026-04-05T19:46:30+5:302026-04-05T19:49:15+5:30
भारतीय विद्यार्थ्यांसाठी जपान सरकारचा LOTUS प्रोग्राम २०२६ जाहीर! कोणाला अर्ज करता येणार? जाणून घ्या...

₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
LOTUS Programme FY2026 : भारतातील मास्टर्स करणारे, पीएचडीचे विद्यार्थी आणि पोस्टडॉक्टोरल संशोधकांसाठी एक मोठी संधी आहे. जपान सरकारने FY2026 साठी LOTUS प्रोग्रामची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत सुमारे १,००० भारतीय विद्यार्थ्यांना जपानमधील अग्रगण्य विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. हा उपक्रम India-Japan Circulation of Talented Youths in Science Programme चा भाग आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारत आणि जपान यांच्यातील वैज्ञानिक सहकार्य मजबूत करणे आणि भारतीय संशोधकांना आंतरराष्ट्रीय संशोधनाचा अनुभव देणे हा आहे.
कोण अर्ज करू शकतो?
LOTUS प्रोग्राम FY2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत.
- अर्जदाराचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असावे
- उमेदवार भारतीय विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेशी संलग्न असावा
- उमेदवार स्वतः अर्ज करू शकत नाही
- अर्ज जपानमधील विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेच्या Principal Investigator (PI) मार्फतच करावा लागेल
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२६ आहे
- निवड प्रक्रिया जून ते ऑगस्ट २०२६ दरम्यान होईल
- अंतिम निकाल ऑगस्ट अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे
संशोधनासाठी प्राधान्य क्षेत्रे
या कार्यक्रमात उच्च प्रभाव असलेल्या संशोधन क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये:
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)
- बायोटेक्नोलॉजी
- ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा
- मटेरियल सायन्स
- क्वांटम टेक्नोलॉजी
- सेमीकंडक्टर्स
- टेलिकॉम
- इंटरडिसिप्लिनरी रिसर्च
या क्षेत्रांमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळू शकते.
LOTUS प्रोग्रामचे दोन ट्रॅक
FY2026 मध्ये हा कार्यक्रम दोन ट्रॅकमध्ये विभागण्यात आला आहे.
1. LOTUS Basic
संशोधन कालावधी: १२ महिने
उद्देश: जपानी प्राध्यापकांसोबत मूलभूत संशोधन सहकार्य
2. LOTUS ASPIRE (नवीन ट्रॅक)
संशोधन कालावधी: ३६ महिने
उद्देश: सखोल संशोधन आणि स्पष्ट परिणाम
अतिरिक्त निधी आणि मूल्यांकन प्रणाली
हा ट्रॅक दीर्घकालीन संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
आर्थिक आणि शैक्षणिक फायदे
LOTUS प्रोग्राम 2026 मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचे फायदे मिळतील.
- मासिक स्टायपेंड: सुमारे १.४ लाख रुपये
- राहण्याचा आणि जेवणाचा खर्च समाविष्ट
- संशोधन आणि जपानमधील प्रवासासाठी अतिरिक्त निधी
- जपानच्या प्रगत संशोधन सुविधा वापरण्याची संधी
- आंतरराष्ट्रीय अकादमिक नेटवर्किंग
- भविष्यात जपानमध्ये इंटर्नशिप किंवा नोकरीची संधी
(भारत-जपान प्रवास खर्च यात समाविष्ट नाही.)
अर्ज प्रक्रिया
LOTUS प्रोग्राम 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.jst.go.jp/program/india/en/call/
- अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज Principal Investigator (PI) मार्फत सबमिट करा
- अर्ज सबमिट झाल्यानंतर पुढील माहिती ईमेलद्वारे मिळेल