शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन अभ्यासाने बिघडले हस्ताक्षर; विद्यार्थ्यांच्या लिखाण गतीलाही लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 23:32 IST

सवयींत झाले बदल, शाळा नसली तरी ऑनलाईन शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करताना सुवाच्च अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा.

स्नेहा पावसकरठाणे : गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष शाळा नसल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली, अभ्यासाची पद्धत, अनेक सवयींत बदल झाले. असाच झालेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे वर्षभर प्रत्यक्ष शाळा न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले तर काहींच्या लेखनगतीलाही ब्रेक लागला आहे. थोडेसे लिखाण केले तरी हात दुखतो, कंटाळा आला अशा मुलांच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.

कोरोनामुळे ठाणे, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वर्षभर जोर होता तो ऑनलाईन शाळेवरच. ऑनलाईन शाळेला अनेक मर्यादा होत्या. प्रत्यक्ष शाळेतील अभ्यास आणि ऑनलाईन अभ्यास यात फरक होता. शाळेत तासिकांप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. दिवसभर शाळेत विद्यार्थ्यांचे बरेच लिखाण होत असते. मात्र या मर्यादित वेळेच्या ऑनलाईन शाळेत लेखनात फार वेळ घालवला जात नाही, परिणामी लेखनाची सवय तुटल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात खूप बदल झाला आहे. हस्ताक्षर बिघडले आहे, अनेकांची अक्षरे वाचताही येत नाही. तसेच ऑनलाईन शाळेतही विद्यार्थ्यांना काही मुद्दे लिहायला सांगितलेच तरीही त्यांचे हस्ताक्षर कसे येते याकडे कोणीही लक्ष देत नाही.

विद्यार्थ्यांनी हे करावे

  1. शाळा नसली तरी ऑनलाईन शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करताना सुवाच्च अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा.
  2. उत्तम हस्ताक्षरात लिहिलेले वाचायला कोणालाही आवडते, त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर दोन ते तीनवेळा लिहावे, जेणेकरून ते उत्तर पाठ होते आणि हस्ताक्षरही सुधारण्यास मदत होते.
  3. एखादा पाठ किंवा त्याचा काही भाग घरातील मोठ्या व्यक्तीस वाचण्यास सांगावा आणि आपण तो भराभर मात्र चांगल्या अक्षरात लिहावा, जेणेकरून लेखनाची गतीही चांगली राहिल. हा असा प्रयत्न आठवड्यातून एकदोन वेळा करणे तर सहज शक्य आहे.

 

ऑनलाईन शाळेदरम्यान विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे कल दिसतो. अभ्यासातील लिखाणाचा भागही महत्त्वाचा असून तो घेतला जातो. मात्र विद्यार्थ्यांना स्वताला समजेल इतके व्यवस्थित लिहावे असा शिक्षक आधीच सल्ला देतात. मात्र यात सवय हा महत्त्वाचा भाग आहे. रोज शाळेत ६-७ तासिकांपैकी ३-४ तासिकांमध्ये हमखास लेखन व्हायचे. नेहमीची सवय झाल्याने अक्षराला वळण राहायचे आणि मूळात लिखाणाची गती हा सवयीचा भाग आहे. परंतु आता दररोज लेखन सक्तीचे नसल्याने मुलांचे हस्ताक्षर बिघडले व गतीही कमी झालेली आहे, असे मत काही मराठी भाषातज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोनाने मुलांचे सर्वच प्रकारे नुकसान केले आहे. प्रत्यक्ष शाळा, अभ्यास नसल्याने मुले आळशी झाली आहेत. लेखनाचा अभ्यास पूर्ण करायला घेतला तरी त्यातील हस्ताक्षर सुंदर आणि सुवाच्च काढण्याचा ते प्रयत्न करत नाहीत.    - दिपेश येंडेराव, पालक

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या