IIT दिल्लीत फेलोशिपची सुवर्णसंधी; स्टायपेंडसह मिळणार मोफत राहण्याची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:33 IST2026-03-18T16:33:23+5:302026-03-18T16:33:33+5:30

अर्ज कसा करावा? पात्रता काय? जाणून घ्या...

Golden opportunity for fellowship at IIT Delhi; Free accommodation facility along with stipend | IIT दिल्लीत फेलोशिपची सुवर्णसंधी; स्टायपेंडसह मिळणार मोफत राहण्याची सुविधा

IIT दिल्लीत फेलोशिपची सुवर्णसंधी; स्टायपेंडसह मिळणार मोफत राहण्याची सुविधा

IIT Delhi Fellowship: देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी संस्था IIT दिल्लीने 'समर रिसर्च फेलोशिप 2026' साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. या फेलोशिपद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

कोण अर्ज करू शकतो?

या फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी लागू आहेत:

मान्यताप्राप्त अभियांत्रिकी किंवा तांत्रिक संस्थेत शिक्षण सुरू असणे आवश्यक

विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना प्राधान्य

किमान 8 CGPA किंवा 75% गुण आवश्यक

IIT दिल्लीमध्ये आधीपासून शिकणारे विद्यार्थी पात्र नाहीत

काय मिळणार?

या फेलोशिपमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव मिळेल. त्यांना अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी, प्रत्यक्ष समस्यांवर आधारित प्रोजेक्ट्स आणि आधुनिक लॅब्स आणि प्रगत उपकरणांचा वापर करता येईल.

स्टायपेंड आणि सुविधा

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹2000 प्रति आठवडा स्टायपेंड

IIT दिल्ली कॅम्पसमध्ये मोफत हॉस्टेल सुविधा

संशोधनासाठी आवश्यक सर्व साधनांची उपलब्धता 

कालावधी आणि अंतिम तारीख

अर्जाची अंतिम तारीख : 3 एप्रिल 2026

फेलोशिप कालावधी : मे ते जुलै (8 ते 10 आठवडे)

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी

ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत

फॉर्म सबमिट करावा

निवड झालेल्या उमेदवारांना जॉइनिंगवेळी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी लागतील.

Web Title : IIT दिल्ली में फेलोशिप का सुनहरा अवसर, स्टाइपेंड और मुफ्त आवास!

Web Summary : आईआईटी दिल्ली ने 'समर रिसर्च फेलोशिप 2026' के लिए आवेदन आमंत्रित किए हैं। इंजीनियरिंग के छात्र ₹2000 प्रति सप्ताह स्टाइपेंड और मुफ्त छात्रावास के साथ अनुसंधान का अनुभव प्राप्त कर सकते हैं। 3 अप्रैल, 2026 तक आवेदन करें।

Web Title : IIT Delhi offers fellowship with stipend and free accommodation.

Web Summary : IIT Delhi invites applications for its 'Summer Research Fellowship 2026'. Engineering students can gain research experience with a stipend of ₹2000/week and free hostel stay. Apply by April 3, 2026.