'ग्लोबल टिचर' रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 5, 2022 19:43 IST2022-08-05T19:42:31+5:302022-08-05T19:43:41+5:30

शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले पत्र

Global Teacher Ranjitsinh Disale resignation not accepted by education officer | 'ग्लोबल टिचर' रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर

'ग्लोबल टिचर' रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर

शितलकुमार कांबळे, सोलापूर: ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर केल्याचे पत्र कुर्डुवाडीचे गटशिक्षणाधिकारी यांना पाठविले आहे.

परितेवाडी (ता. माढ) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक डिसले गुरुजी यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता. आठ ऑगस्टपर्यंत ते नोटीस पिरियडवर होते. आठ ऑगस्ट रोजी ते अमेरिकेला जाणार होते. त्यांच्या राजीनाम्याबाबत भूमिकाही त्यांनी त्याच दिवशी जाहीर करण्याचे सांगितले होते.

या दरम्यान डिसले गुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. काही दिवसानंतर त्यांनी जिल्हा परिषदचे सीईओ दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा केली. यानंतर डिसले गुरुजी यांचा राजीनामा नामंजूर होईल अशी चर्चा होती. अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने डिसले गुरुजींचा राजीनामा प्रशासकीय कारणासाठी नामंजूर केला असून ते जिल्हा परिषदेच्या सेवेत असतील असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांना पाठविले आहे.

Web Title: Global Teacher Ranjitsinh Disale resignation not accepted by education officer