शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अकरावीसाठी तात्पुरते प्रवेश द्या, परीक्षा नंतर घ्या; यूजीसीच्या माजी उपाध्यक्षांनी सुचविले पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 8:55 AM

याेग्य यंत्रणा उभारून परीक्षांचा ऑनलाइन पर्यायही सर्वसमावेशक ठरेल. विद्यार्थ्यांची बहुपर्यायी उत्तरांची तयारी करून ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ही परीक्षा घेणे शक्य होईल.

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात की करू नयेत यावरून न्यायालयात याचिकांचा खच पडत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांत अस्वस्थता आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांत स्वतःला सिद्ध करायचे असल्याने परीक्षा रद्द हा त्यावर उपाय ठरू शकत नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळास्तरावर तात्पुरत्या स्वरूपात अकरावीमध्ये प्रवेश द्यावा आणि बारावीच्या परीक्षेच्या आधी म्हणजेच २ वर्षांच्या कालावधीत केव्हाही दहावी परीक्षेला बसून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी द्यावी, असा पर्याय यूजीसीचे माजी उपाध्यक्ष व आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी सुचविला.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य दिले तरी भविष्यातील शैक्षणिक हिताच्या दृष्टीने परीक्षा रद्द करणे हा पर्याय योग्य नसल्याने इतर पर्यायांविषयी चर्चा करताना याचिकाकर्ते ॲड. धनंजय कुलकर्णी यांना हा पर्याय सुचविला आहे. हा पर्याय सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळांसाठी लागू करता येईल. मात्र, त्यावेळी ही मंडळे देशभरात कार्यरत असल्याने त्यांच्यासाठी राज्य हे विभागीय स्तर समजून याची अंमलबजावणी करता येणे शक्य होणार असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी सुचविले.

याेग्य यंत्रणा उभारून परीक्षांचा ऑनलाइन पर्यायही सर्वसमावेशक ठरेल. विद्यार्थ्यांची बहुपर्यायी उत्तरांची तयारी करून ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ही परीक्षा घेणे शक्य होईल. परीक्षा रद्द करून पुढच्या वर्गात ढकलण्यापेक्षा हा पर्याय स्वागतार्ह आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण परीक्षेपूर्वी प्राधान्याने करणे गरजेचे!डॉ. पटवर्धन यांनी पर्याय सूचविताना काही शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा केली. कोरोनाचा संसर्ग आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांची सुरक्षा लक्षात घेता, परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असे मतही त्यांनी मांडले. या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीचे दाेन डोस १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक ठरविल्यास विद्यार्थ्यांनाही सुरक्षितपणे तसेच तणाव न घेता परीक्षा देण्यास वेळ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :ssc examदहावी