'सीईटी'मुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल; तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 09:57 IST2026-03-09T09:56:43+5:302026-03-09T09:57:52+5:30

मुंबई विद्यापीठाने हे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

Changes in university exam schedule due to 'CET'; Revised dates for third year exams announced | 'सीईटी'मुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल; तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

'सीईटी'मुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल; तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांमुळे मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने हे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ च्या परीक्षेतील २७ मार्चची परीक्षा आता ४ एप्रिलला घेण्याचे जाहीर केले आहे. तर बीए, बीएससी, बीएससी (कम्प्युटर सायन्स), बीएमएमसी आणि बीए सत्र ५ (सीडीओई) च्या २७ मार्च, ३० मार्च आणि १, २, व ४ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा आता अनुक्रमे ९, १०, ११, १३ आणि १५ एप्रिलला घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ तृतीय वर्ष सत्र ६ बीकॉम, बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), (बँकिंग अँड इन्शुरन्स), (अकाउंटिंग अँड फायनान्स), (इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट), (फायनान्शिअल मॅनेजमेंट), (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम/बीएमएस (इन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट अँड इको), बीएमएस, बीकॉम (सीडीओई), बीकॉम (अकाउंट्स अँड फायनान्स) या परीक्षा १ एप्रिलला घेणार होते. त्या परीक्षा आता ९ एप्रिलपासून घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

नियोजित तारखांची नोंद घेण्याचे आवाहन

तृतीय वर्ष सत्र ६ बीएससी, बीएससी (कॉम्प्युटर सायन्स), (बायोटेक), (आयटी), (डेटा सायन्स), (आयटी - सीडीओई), (कम्प्युटर सायन्स-सीडीओई) आणि तृतीय वर्ष सत्र ६ बीए आणि तृतीय वर्ष सत्र ६ बीएमएमसी या परीक्षा ८ ऐवजी १६ एप्रिलपासून सुरू होतील.

सुधारित वेळापत्रक आणि नियोजित तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

Web Title : सीईटी के कारण विश्वविद्यालय परीक्षा समय-सारणी में बदलाव; संशोधित तिथियाँ घोषित।

Web Summary : सीईटी के कारण मुंबई विश्वविद्यालय ने ग्रीष्मकालीन परीक्षाएँ स्थगित कीं। संशोधित समय-सारणी ऑनलाइन प्रकाशित। बीकॉम की 27 मार्च की परीक्षा अब 4 अप्रैल को। अन्य परीक्षाएँ 9-16 अप्रैल को पुनर्निर्धारित। छात्रों को बदलाव नोट करने की सलाह दी जाती है।

Web Title : CET causes University exam timetable change; Revised dates announced.

Web Summary : Mumbai University postpones summer exams due to CET. Revised schedule published online. BCom's March 27 exam is now April 4. Other exams rescheduled to April 9-16. Students advised to note changes.